Wednesday, April 23, 2025
Home मराठी प्रार्थना बेहेरेच्याही घरी झाले बाप्पाचे दणक्यात स्वागत, वक्रतुंडाची आराधना करताना दिसली अभिनेत्री

प्रार्थना बेहेरेच्याही घरी झाले बाप्पाचे दणक्यात स्वागत, वक्रतुंडाची आराधना करताना दिसली अभिनेत्री

महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. अनेक कलाकारांच्या घरात देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. कलाकारांनी त्यांच्या गणपती बाप्पासोबत सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. अनेक कलाकारांच्या घरातील देखावे तसेच अनेक परंपरा या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. अनेक कलाकारांनी खास थीम घेऊन कलाकृती केली आहे. प्रत्येकजण आपल्या बाप्पासाठी हे ५ दिवस जे काही खास करता येईल ते करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आपल्या सगळ्यांची आवडती अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले आहे.

प्रार्थनाने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिच्या घरच्या बाप्पाची पूजा करताना एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने फुलांची आरास केली आहे. तिच्यासोबत तिचा पती देखील दिसत आहे. तसेच व्हिडिओमध्ये प्रार्थना देखील खूप सुंदर दिसत आहे. तिने हिरव्या रंगाचा एक खूप सुंदर ड्रेस घातला आहे. तसेच या ड्रेसवर तिने पिवळ्या रंगाची ओढणी घेतली आहे. कानात मोठे ईअरिंग घातले आहेत. ती गणपतीची पूजा करताना दिसत आहे. (Prarthna behere share a vedio with her home bappa)

हा व्हिडिओ शेअर करून तिने “वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्न कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा” असे कॅप्शन दिले आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट येत आहेत.

प्रार्थना बेहरेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तिच्या करिअरला सुरुवात केली. या मालिकेत तिने अंकिता लोखंडेच्या छोट्या बहिणीचे पात्र निभावले होते. या पात्राने ती घराघरात पोहोचली. त्यानंतर तिने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवले. चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवल्यानंतर तिच्या करिअरला असे काही वळण मिळाले की, केवळ ‘मितवा’ या एका चित्रपटाने तिला सर्वत्र प्रसिद्धी मिळाली. ‘मितवा’ या चित्रपटासाठी प्रार्थना नाईन ‘एक्स झकास हिरोइन’ या शोची विजेती स्पर्धक झाली होती. यानंतर तिने ‘व्हाट्सअप लग्न’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’, ‘ती आणि ती’, ‘मस्का’, ‘लव यू जिंदगी’, ‘फुगे’ या चित्रपटात काम केले. ती सध्या झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रेमाला कोणतीही सीमा नसते! ‘या’ अभिनेत्रींनी स्वतःपेक्षा लहान वयाच्या मुलासोबत बांधली लग्नगाठ

-मराठी कलाकारांच्या घरात झाली श्रींची स्थापना, फोटो शेअर करून दाखवली बाप्पाची झलक

-मराठी कलाकारांच्या घरी झाले गणरायाचे आगमन, सुंदर फोटोंवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

हे देखील वाचा