Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘तुझीच सेवा करू काय जाणे…’, अभिज्ञा भावेने विठ्ठलरुपी गणरायाची स्थापना करत दिले ‘खास’ कॅप्शन

मराठी टेलिव्हिजनवर काम करून रसिकांच्या मनात अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने तिची खास जागा निर्माण केली आहे. तिचे पात्र प्रेक्षकांना खूप आवडतात. सोशल मीडियावर देखील ती बऱ्यापैकी सक्रिय असते. नुकतेच सगळ्यांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. अनेक कलाकारांनी देखील त्यांच्या घरातील गणरायाचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्री अभिज्ञा भावे देखील तिच्या बाप्पासोबत फोटो शेअर करून एक खास कॅप्शन दिले आहे.

अभिज्ञाने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिच्या घरातील बाप्पासोबत काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिच्यासोबत तिचा पती देखील दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता त्यांनी खूप सुंदर पद्धतीने बाप्पाची आरास केली आहे. तिने पाना-फुलांनी सजावट केली आहे. तिच्या बाप्पाचे खास आकर्षण म्हणजे तिने विठ्ठलाच्या रूपातील गपणती बाप्पाची स्थापना केली आहे. फोटोमध्ये पाहू शकतो की, बाप्पाचे रूप खुलले आहे. (marathi actress abhidnya bhave share a photo with her home bappa)

हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “विठ्ठल रुपी गणराया. तुझीच सेवा करू काय जाणे. यापुढे सगळं उत्तम होणार. आजचा दिवस शब्दात मांडणं कठीण आहे. बाप्पाने सेवा करायची संधी दिली यातच सगळं आलं. एक रेखीव माणूस घरी राहायला आल्याचा अनुभव डोळ्यात पाणी आणणारा आहे.” तिने शेअर केलेल्या या फोटोवर अनेक कलाकार त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. या फोटोवर श्रेया बुगडे, तेजस्विनी पंडित, ऋतुजा बागवे, नंदिता पाटकर, मयुरी देशपांडे आणि खुशबू तावडे यांसारख्या कलाकारांनी कमेंट करून तिच्या बाप्पाच्या मूर्तीचे कौतुक केले आहे.

अभिज्ञाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘खुलता कळी खुलेना’, ‘तुला पाहते रे’, ‘रंग माझा वेगळा’, लगोरी’, ‘देवयानी एक्का राजा राणी’, ‘लव्ह यू जिंदगी’, ‘प्यार की ये कहाणी’ या मालिकेमध्ये काम केले आहे. तसेच ती सध्या ‘पवित्र रिश्ता २.०’ या मालिकेत अंकिता लोखंडेसोबत काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘माझ्या सर्वस्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा’, म्हणत सिद्धार्थने पत्नी मितालीला केले विश

-आहा…किती ते देखणं रूप! प्रार्थना बेहेरेचे सुंदर फोटो पाहून चाहत्यांच्या बत्त्या गुल

-काळजाचा ठोका चुकवणारी बातमी! चिरंजीवीचा भाचा अन् अभिनेता साई धरम तेजचा अपघात; आता कशीय तब्येत?

हे देखील वाचा