टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे २ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याने वयाच्या अवघ्या ४० व्या अखेरचा श्वास घेतला. सिद्धार्थच्या निधनाने त्याच्या कुटुंबीयांना, मित्र परिवाराला त्याचबरोबर त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. आभिनेत्याच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे. त्याची सर्वात जवळची मैत्रीण शहनाझ गिलला देखील खूप मोठा धक्का बसला होता. सिद्धार्थच्या जाण्याने ती पूर्णपणे खचली आहे. तर काहीजण तर या घटनेवर विश्वास ठेवून शकत नाहीत.
याच दरम्यान सिद्धार्थच्या निधनानंतर अभिनेत्री जसलीन मथारूला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खरं तर जसलीनच्या मतानुसार, सिद्धार्थच्या मृत्यूने तिला खूप धक्का बसला होता. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. जसलीनने रुग्णालयामधून एक व्हिडिओ देखील शेअर केला होता. ज्यात ती सिद्धार्थच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करताना दिसली. त्याचबरोबर तिच्या हाताला एक ड्रिप लावलेली होती आणि तिचा चेहरा देखील खूप उदास दिसत होता.
https://www.instagram.com/tv/CTd9rHmoTMc/?utm_source=ig_web_copy_link
परंतु अलीकडेच जसलीनने रुग्णालयामधून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती ‘शेरशाह’ या चित्रपटातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर तिच्या चेहऱ्यावरून सर्व दुःख निघून गेले आहे. ती ज्या प्रकारे हसत आहे आणि गाणं म्हणत आहे, त्यामुळे टीकाकारांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ शेअर करत जसलीनने लिहिले की, “कारण ते ट्रेंडिंग आहे, हे चांगले आहे जे मी करू शकते.”
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सिद्धार्थ शुक्लाचे चाहते खूप संतापले आहेत. ते जसलीनवर जोरदार टीका करत आहे. चाहत्यांच्या मते, “ती फक्त टीआरपीसाठी नौटंकी करत होती.” चाहत्यांच्या मते, “जर तिला सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूबद्दल खूप दुःख झाले असते, तर तिने असा व्हिडिओ शेअर केला नसता.” खरं तर जसलीनला सोशल मीडियावर अनेक मेसेज आले होते की तुही मरून जा, ज्याचा तिच्यावर खोल परिणाम झाला आणि तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–सलमान खानच्या कुटुंबीयांनी वाजत गाजत दिला दिड दिवसाच्या बाप्पाला निरोप
–‘त्याच्याबरोबर’ प्रिया बापटने शेअर केला उमेश कामतसोबतच गोड फोटो, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
–‘क्या खूब लगती हो!’ सिंपल आणि स्वीट लूकमधील तेजस्विनी पंडितचे आकर्षक फोटो