नेहमी चर्चेत कसे राहायचे, हे ‘मुन्नी’ला म्हणजेच अभिनेत्री मलायका अरोराला चांगलेच माहिती आहे. मलायका ही गेल्या अनेक दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच मलायकाचा एक थ्रोबॅक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये मलायका बेले डान्स करताना दिसून येत होती. या व्हिडिओमधील मलायकाचा डान्स पाहून चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळून राहिल्या. याच दरम्यान, मलायकाचा आणखी एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका शोचा आहे. ज्यात मलायका मॉडेल मिलिंद सोमणसोबत अनेक मुद्द्यांवर चर्चा करताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये एक असा क्षण आहे, ज्यावेळी मलायका मिलिंद सोमणला सांगते की, तिला कोणत्या प्रकारची व्यक्ती सर्वात जास्त आवडते. मलायका खुलासा करत सांगते की, तिला असा व्यक्ती आवडतो जो खूप चांगल्या पद्धतीने किस करतो. मात्र, हे देखील तितकंच खरं आहे की, मलायका अभिनेता अर्जुन कपूरसोबत गंभीर नात्यात आहे आणि दोघेही अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसतात. त्याचबरोबर मलायकाच्या करिअरबद्दल बोलायचे झाले, तर मलायका अरोरा अनेक शोमध्ये दिसते आणि ती स्वतःचा योगा स्टुडिओ चालवते.
मलायकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर मलायकाचा मुलगा अरहान खान अलीकडेच उच्च शिक्षणासाठी परदेशात गेला आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, मलायकाने शालेय शिक्षण पूर्ण होताच आपल्या मुलाला पुढील शिक्षणासाठी परदेशात पाठवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत मलायका म्हणाली होती की, “ती मुलगा अरहानशिवाय जगण्याचा प्रयत्न करत आहे, पण तिच्यासाठी हे करणे खूप कठीण आहे.”
मलायकानुसार, शालेय शिक्षण पूर्ण होताच तिने अरहानला त्याच्या वेळेचा उत्तम वापर करून काही ना काही कौशल्य शिकायला सांगितले. अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा घटस्फोट झाला असून अरहान हा आई मलायकाकडे राहतो.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही नक्की वाचा-
अरबाज खानच्या ‘या’ सवयीला कंटाळली होती मलायका अरोरा, स्वत: केला खुलासा
मलायका अरोराने केला आवडत्या जोडीदाराचा खुलासा, पण अर्जुन कपूर नाहीये तो व्यक्ती!