रुपेरी पडता असो किंवा खरे आयुष्य दीपिका पदुकोणचा जलवा हा सगळीकडेच कायम असतो. तिच्या चित्रपटांप्रमाणेच दीपिकाची लाईफस्टाईल देखील ‘लार्जर दॅन लाईफ’च्या श्रेणीत येते. दीपिकाकडे मुंबईत अनेक ठिकाणी अनेक आलिशान गाड्या आणि घरे आहेत. याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया…
माध्यमांतील वृत्तानुसार, दीपिका महिन्याला चार कोटी आणि वर्षाला सुमारे ४० कोटी कमावते. तिच्या एका चित्रपटाची फी सुमारे १५ कोटी आहे. तिची एकूण संपत्ती ३५१ कोटींच्या जवळपास असल्याचा अंदाज आहे. आता एवढे मानधन घेते म्हणल्यावर दीपिकाकडे आलिशान गाड्यांचीही लाईन लागली असणार यात शंकाच नाही. तिला गाड्यांची खूप आवड असून ती अनेक आलिशान गाड्यांची मालकीण आहे.
दीपिकाने घेतला नवीन बंगला
काही दिवसांपूर्वीच अशी माहिती समोर आली होती की, दीपिका आणि रणवीरने अलिबागमध्ये पाच बीएचके बंगला घेतला आहे. ज्यात ग्राऊंड प्लस पहिला मजला आहे. त्याची किंमत सुमारे २२ कोटी सांगितली जात होती. दीपिकाचे वांद्रे, मुंबई येथे एक अपार्टमेंट आहे, ज्याची किंमत सुमारे ७ कोटी रुपये आहे.
दीपिकाच्या या अपार्टमेंटची किंमत आहे इतकी
दीपिकाचे प्रभादेवी, मुंबई येथे एक अपार्टमेंट आहे, जे २६ व्या मजल्यावर आहे. या अपार्टमेंटची किंमत अंदाजे ४० कोटी आहे. दीपिकाची मुंबईसारख्या ठिकाणी अनेक घरे आहेत आणि सर्व एकापेक्षा एक आलिशान आहेत.
दीपिकाला कार देखील आवडतात
दीपिकाकडे अपार्टमेंट आणि बंगले तर आहेतच. तसेच तिच्याकडे अनेक आलिशान गाड्या देखील आहेत. तिच्याकडे मर्सिडीज मेबॅक सीरिज कार आहे, त्याची किंमत १.६७ कोटी आहे.
And it's blue Mercedes … congratulations my love ❤️???????? @deepikapadukone pic.twitter.com/xRi2kswGYb
— Zainab ???? (@eng_ZainabAb) November 25, 2016
याव्यतिरिक्त, दीपिकाकडे २ ऑडी देखील आहेत. तिच्याकडे या श्रेणीतील ऑडी ए८ आणि ऑडी क्यू७ आहे.
पहिल्या कारची किंमत १.५६ कोटी आणि दुसरीची किंमत सुमारे ९३.३५ लाख आहे. दीपिकाकडे बीएमडब्ल्यू ५ सीरिजची देखील आहे, ती दीपिकाला खूप आवडते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मलायका अरोराला आवडतो ‘अशा’प्रकारचा व्यक्ती, मिलिंद सोमणपुढे केला खुलासा
-निधन झाले गायिकेचे, पण सपना चौधरीलाच ठरवले मृत; अफवेने उडाली होती कुटुंबीयांची झोप










