‘मराठी बिग बॉस ३’ हा शो टेलिव्हिजनवर येण्यासाठी अवघे तीन दिवस उरले आहेत. बिग बॉस प्रेमी या पर्वाची गेल्या वर्षभरापासून वाट बघत आहेत. या वर्षी जेव्हा जून महिन्यात या शोची घोषणा झाली तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यानंतर या शोचे तीन प्रोमो समोर आले आहेत. बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाचा आरंभ रविवारी (१९ सप्टेंबर ) होणार आहे. यासोबत या शोमध्ये कोण-कोणते स्पर्धक असणार आहेत, याची देखील प्रेक्षकांमध्ये मागील अनेक दिवसांपासून चर्चा चालू आहे. या वर्षी देखील हा शो महेश मांजरेकर होस्ट करणार आहेत. अशातच बिग बॉसचे दोन नवीन प्रोमो समोर आले आहेत. यामध्ये बिग बॉसमधील दोन स्पर्धकांची झलक पाहायला मिळत आहे. ( Bigg Boss Marathi 3, contestent reveal, promo get viral)
कलर्स मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून बिग बॉसच्या ग्रँड प्रिमिअरमधील दोन स्पर्धकांची झलक दाखवली आहे. यामध्ये एक स्त्री आणि एक पुरुष दिसत आहे. पण अजूनही त्या दोघांचा चेहरा समोर आला नाही. पहिल्या प्रोमोमध्ये एक अभिनेत्री ‘परम सुंदरी’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून कॅप्शन दिले आहे की, “तिची अदा हटके, तिची चाल काळजाचा ठोका चुकवे, कोण असेल ती?” या फोटोवर अनेकजण अंदाज लावत आहे. कोणी म्हणत आहे की, हिना खान आहे तर कोणी म्हणत आहे अक्षया देवधर आहे. यासोबत फुलवा खामकर, स्नेहा वाघ ही नावे समोर येत आहे. पण ही अभिनेत्री कोण आहे. पण याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही.
दुसऱ्या प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक अभिनेता ‘आवाज वाढव डीजे’ या गाण्यावर बुलेटवर एंट्री करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तो एकंदरीत खूपच डॅशिग आणि स्टायलिश दिसत आहे. तसेच त्याच्या एंट्रीवर सगळे प्रेक्षक टाळ्यांच्या गजरात स्वागत करत आहेत. हा व्हिडिओ शेअर करून कॅप्शन दिले आहे की, “तमाम पोरींच्या काळजाची धडधड आता वाढणार, जेव्हा त्याची एंट्री होणार.” या व्हिडिओवर अनेकजण कमेंट करून हा अभिनेता कोण असेल हा अंदाज लावत आहेत. अनेकजण हा चिन्मय उदगीरकर आहे असे सांगत आहेत. तर काहीजण हा अक्षय वाघमारे आहे असे म्हणत आहेत.
बिग बॉसमध्ये कोण-कोणते स्पर्धक असणार आहेत. तसेच ते ग्रँड प्रिमिअमला कोणत्या गाण्यावर परफॉर्मन्स करणार आहेत. हे आता येत्या रविवारी (१९ सप्टेंबर) संध्याकाळी ७ वाजता आपल्या कलर्स मराठी या वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मलायका अरोराला आवडतो ‘अशा’प्रकारचा व्यक्ती, मिलिंद सोमणपुढे केला खुलासा
-निधन झाले गायिकेचे, पण सपना चौधरीलाच ठरवले मृत; अफवेने उडाली होती कुटुंबीयांची झोप
-ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद, ‘ही’ आहे शेवटची पोस्ट