Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

बँकेतील नोकरी सोडून ‘जेठालाल’च्या दुकानात काम करू लागला ‘बाघा’; मिळायचा ‘इतका’ पगार

सब टीव्हीवरील सुपरहिट शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे सतत मनोरंजन करत आहे. या शोचे प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. २००८ मध्ये सुरू झालेल्या या शोने प्रत्येक कलाकाराला घरोघरी ओळख मिळवून दिली. प्रत्येक पात्राप्रमाणे, शोमध्ये आणखी एक पात्र आहे. ज्याने आपल्या निरागसतेने लोकांची फक्त मने जिंकली नाही, तर तो ‘बाघा’ म्हणून घरोघरी लोकप्रिय झाला. याच बाघाचे खरे नाव तन्मय वेकारिया असे आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये बाघाची भूमिका साकारत असलेल्या तन्मयला या भूमिकेसाठी खूप कष्ट करावे लागले.

इतका होता तन्मयचा पगार
या शोमध्ये काम मिळण्यापूर्वी तन्मय इतक्या कमी पगारामध्ये काम करायचा की, हे ऐकल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. तन्मय हा एका खासगी बँकेत बँकर होता. त्याला या नोकरीसाठी फक्त चार हजार रुपये मिळत होते. त्याने मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केले, पण तन्मयचे वडील अभिनेते होते आणि त्याला ही नेहमीच अभिनेता व्हायचे होते.

लहान भूमिकांपासून केली सुरुवात
तन्मयने आपल्या कारकिर्दीची सुरुवात छोट्या छोट्या भूमिकांपासून केली होती. याआधी याच शोमध्ये त्याने ऑटो ड्रायव्हर, टॅक्सी ड्रायव्हर, इन्स्पेक्टर आणि शिक्षक अशा वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. २०१० मध्ये, त्याला ‘बाघा’ची भूमिका मिळाली. ज्यामुळे तो प्रत्येक घराघरात पोहोचला. ‘बाघा’ची भूमिका स्वीकारणे हा त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय ठरला. १३ वर्षांनंतरही, तो अजूनही तेच पात्र अतिशय उत्तमप्रकारे बजावत आहे.

१५ वर्ष केले थिएटर
तन्मय वेकारिया, हा मूळचा गुजरातमधील आहे. त्याने अनेक गुजराती चित्रपटगृहांमध्ये १५ वर्षे काम केले. वडिलांकडून मिळालेली ही अभिनय कला बाघा उर्फ ​​तन्मयने खूप चांगली वापरली. तन्मयने त्याचे प्रत्येक पात्र इतक्या साधेपणाने आणि बारकाईने साकारले की, त्याला पाहणारे पाहतचं राहिले.

चित्रपटांमध्येही काम केले
यापूर्वी तन्मयने चित्रपट आणि गुजराती मालिकांमध्ये आपले कौशल्य दाखवले होते. त्याने गुजराती कॉमेडी नाटक ‘घर घर नी वात’ मध्ये काम केले होते. याव्यतिरिक्त, तो २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘समय चक्र टाइम स्लॉट’ या चित्रपटातही दिसला होता.

जेठालालचा खास आहे बाघा
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये बाघाची भूमिका साकारणारा तन्मय वेकारिया जेठालालचा खास व्यक्ती आहेत. जेठालालच्या दुकानात काम करणारे नटू काकाचा तो नातेवाईक असतो. या शोमधील त्याची भूमिका चांगलीच आवडली आहे. बाघाची फक्त बोलायची शैली चांगली आहे असे नाही तर, त्याचा संपूर्ण अंदाजच वेगळा आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘लय भारी’ तेजस्विनीच्या मराठमोळ्या सौंदर्याची सर्वांनाच भुरळ, पदरावरील ‘त्या’ श्लोकाने वेधले खास लक्ष

-‘दिसला गं बाई दिसला’, म्हणणाऱ्या ‘राजा राणीची गं जोडी’ फेम संजूचा गावरान अवतार भावला नेटकऱ्यांना

-सूरज पांचोलीला दिलासा, जिया खान आत्महत्या प्रकरणी सीबीआयची याचिका विशेष न्यायालयाने फेटाळली

हे देखील वाचा