Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

धर्म वेगवेगळे असल्याने तिसऱ्याच धर्मानुसार केले सनाया अन् मोहितने लग्न; वाचा अभिनेत्रीबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

टीव्ही शो आणि मालिकांमधील सुप्रसिद्ध जोडी सनाया ईरानी आणि मोहित सहगल ही आहे. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. ‘मिले जब हम तुम’ या मालिकेमधून दोघांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या दोघांची प्रेम कहाणी एका चित्रपटाच्या रोमँटिक स्टोरीपेक्षा कमी नाही. शुक्रवारी (१७ सप्टेंबर) सनाया तिचा वाढदिवस साजरा करते. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीबद्दल आणि तिच्या प्रेमकहाणी बद्दल.

सनायाचा जन्म मुंबईमध्ये १७ सप्टेंबर १९८३रोजी एका पारशी कुटुंबात झाला. तिचे प्राथमिक शिक्षण उटी येथील एका बोर्डिंग शाळेमध्ये पूर्ण झाले. त्यानंतर सिडनहॅम महाविद्यालयातून तिने पदवीचे शिक्षण पूर्ण केले. एमबीएमध्ये तिने पदवी संपादन केली. त्यानंतर मॉडलिंगमध्ये आपले नशीब आजमावले. आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीमध्ये तिने सुरुवातीला खूप संघर्ष केला. छोट्या पडद्यावर झळकण्याआधी तिने शाहरुख खान, करीना कपूर, सैफ अली खान आणि प्रियंका चोप्रा अशा अनेक मोठ्या कलाकारांबरोबर अभिनय आणि काही जाहिराती केल्या. यामध्ये तिने स्लाइस , प्रियंका चोप्रासह लक्स साबण, अमिताभ बच्चन यांच्यासोबत डाबर हनी, तर ब्लेमॉन्ट कपड्यांच्या ब्रँडमध्ये शाहरुख खानसोबत जाहिरात केली आहे. (Sanaya Irani has worked with Kareena Kapoor to Priyanka Chopra actress birthday no interesting thing related to her love story)

अभिनेत्रीने साल २००६ मध्ये आलेला चित्रपट ‘फना’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटामध्ये तिने मेहबूब ही सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका पार पाडली होती. ‘पिहू’ आणि ‘सिमरन सिंग’ या चित्रपटांमध्ये देखील ती झळकली होती. साल २००७ मध्ये तिने छोट्या पडद्यावर अभिनयाला सुरुवात केली. तिची पहिली मालिका ‘लेफ्ट राईट लेफ्ट’ ही होती. त्यानंतर ती ‘कसम से’, ‘राधा की बेटीया कुछ कर दिखायेंगी’, ‘मिले जब हम तुम’, ‘कहो ना यार है’, ‘इस प्यार को क्या नाम दु’, ‘आज की रात है जिंदगी’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले. तसेच ती साल २०१६ मध्ये ‘आय डोन्ट वॉच टीव्ही’ या वेब सेरीजमध्येही झळकली. तिने अनेक रियालिटी शोमध्ये देखील सहभाग घेतला होता. ‘नच बलिये ८’ मधून तिने आपल्या डान्सने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तसेच ‘इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार’, ‘किचन चॅम्पियन ५’ आणि ‘खतरा खतरा खतरा’ या शोमध्ये देखील ती झळकली होती.

चित्रपटाच्या कथेप्रमाणे आहे सनायाची प्रेम कहाणी
साल २०१६मध्ये मोहित सहगलसह अभिनेत्रीने विवाह केला. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे दोघे ‘मिले जब हम तुम’ या मालिकेमध्ये भेटले होते. मालिका संपेपर्यंत या दोघांमध्ये फक्त कामापुरताच संवाद होत होता. या मालिकेच्या शूटिंगवेळी त्या दोघांना एक स्क्रिप्ट देऊन एकत्र प्रॅक्टिस करायला सांगितले होते. तेव्हा पूर्ण डायलॉग बोलून झाल्यावर ते दोघे एकमेकांकडे पाहून हसू लागले.

मालिका संपल्यानंतर देखील ते दोघे एकमेकांना भेटायचे. जमेल तेवढा वेळ एकत्र घालवायचे. दोघेही एकमेकांच्या प्रेमामध्ये अडकले होते. परंतु दोघांनी ही गोष्ट एकमेकांना लवकर सांगितली नाही. अभिनेता अर्जुन बिजलानीने त्या दोघांना एकमेकांवर असलेल्या प्रेमाची जाणीव करून दिली. त्यानंतर या गोड मैत्रीला पवित्र प्रेमाचे रूप प्राप्त झाले. मोहित पंजाबी आणि सनाया पारशी असल्याने त्या दोघांना लग्न करावे की नाही असा प्रश्न पडला होता. तसेच लग्न केले, तर कोणत्या धर्मातील रीतींप्रमाणे करावे हे त्यांना समजत नव्हते. त्यामुळे या दोघांनीही आपल्या धर्मामध्ये लग्न न करता हिंदू धर्मातील रीतींप्रमाणे लग्न केले. गोव्याच्या समुद्र किनारी या दोघांनी एकमेकांचा हात आयुष्यभरासाठी हाती घेतला. सध्या दोघेही आपल्या संसारात सुखी आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कू’ ऍपवरही कंगना रणौत गाजवतेय वर्चस्व; काही दिवसांतच मिळवले तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स

-‘हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट’, म्हणत मनोज पाटील आत्महत्या प्रकरणावर साहिल खानने सोडले मौन

-शूटिंग सोडून तुर्कीमध्ये ‘हे’ काम करताना दिसली बॉलिवूडची ‘बार्बी गर्ल’, व्हिडिओ शेअर करत म्हणतेय…

हे देखील वाचा