टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध शो ‘कौन बनेगा करोडपति १३’कडे माहितीचा स्त्रोत म्हणून बघितले जाते. या शोमध्ये प्रत्येक आठवड्यातील शुक्रवार ‘शानदार शुक्रवार’ म्हणून साजरा केला जातो. तसेच या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहतात. यावेळी टोक्यो ऑल्मिपिकमध्ये पदक मिळवून आपल्या भारत देशाची मान उंचवणारे खेळाडू उपस्थित होते. तसेच हाॅकी टीमचा गोलकिपर पी.आर. श्रीजेशही यावेळी उपस्थित होता. यावेळी श्रीजेशला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले.
या शोचे सुत्रसंचलन अमिताभ बच्चन करत आहेत. मंचावर उपस्थित असलेल्या सेलिब्रिटींचे अमिताभ नेहमी कौतुक करुन काही मजेशीर किस्सेही शेअर करताना दिसतात. असाच एक व्हिडिओ अमिताभ यांनी श्रीजेशला दाखवला. या व्हिडिओत भारतीय हाॅकी टीमने ऑलपिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यावर श्रीजेशचे भावनिक झालेले कुटुंब दाखवण्यात आले आहे. श्रीजेशच्या या क्षणामागे नक्की कोणाचा हात आहे? या प्रश्नाचे उत्तर या शोच्या एपिसोडमध्ये मिळाले. अनेकदा खडतर प्रवास करुन देशाला सुवर्णपदक जिंकून देणार्या श्रीजेशचा प्रवास त्याने या मंचावर शेअर केला.
शोचे सुत्रसंचलन अमिताभ यांनी श्रीजेशला विचारले की, त्यांचे वडिलांसोबतचे नाते कसे आहे? यावर प्रतिउत्तर देताना श्रीजेश म्हणाला की, “मी एक शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. बालपणी मी खूप खोडकर होतो. त्यामुळे वडिलांचा अनेकदा मारही खावा लागला. परंतु, जी. व्ही. राजा स्पोर्ट्स स्कूलमध्ये माझी निवड झाली. त्यावेळी वडिलांनी मला प्रश्न विचारला. ते म्हणाले की, हाॅकीमध्ये पुढे गेला तर तुला नोकरी मिळेल का? फक्त इतकंच नव्हे, तर अनेकांनी मला फुटबॉल खेळण्याचा सल्ला दिला. कारण केरळमध्ये या खेळाला विषेश महत्व दिले जाते. मात्र, मी वडिलांना सांगितले की, मला तीन वर्ष द्या. मी प्रयत्न करून बघतो. यशस्वी झालो नाही तर मी नवीन मार्गाने माझे करियर सेट करेल. त्यानंतर मी हाॅकीचा दांडू हातात घेतला. पुन्हा कधी मागे वळून पाहिलेच नाही आणि गोलकीपर झालो.”
तसेच त्याने हे सुवर्ण पदक जिंकल्यानंतर वडिलांना समर्पित केले. टोकियो ऑलिम्पिक २०२०मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल श्रीजेश म्हणाला की, “मी स्वतःला इतकचं सांगितलं की, हा खेळ तू २१ वर्षाचा असल्यापासून खेळत आहे. आता तुला हा खेळ पूर्णत्वाला घेऊन जायचा आहे आणि पेनाल्टी वाचवायची आहे.” श्रीजेशने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये प्रचंड मेहनत घेतली. याशिवाय त्याने उपांत्य फेरीत बेल्जियम विरूद्धात झालेल्या पराभवानंतर संपूर्ण संघाला खूप प्रोत्साहन देण्याचे काम श्रीजेशने केले.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-KBC: ‘शानदार शुक्रवार’च्या भागात ‘या’ खेळाडूंनी लावले चारचांद, अमिताभ यांना अश्रू अनावर
-Bigg Boss OTT: राकेश अन् शमिताच्या वाढत्या जवळीकतेबद्दल बोलली पूर्व पत्नी, ‘अशी’ दिली प्रतिक्रिया










