आपल्या आयुष्यामध्ये अनेक चढ उतार येत असतात. या सर्वांवर मात करत, प्रत्येक अडचणींबरोबर खंबीरपणे लढत आपल्याला पुढे जायचे असते. अशात अनेकवेळा काही व्यक्तींच्या हातून चुका घडतात. त्याची शिक्षा देखील ते भोगतात. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या आयुष्यातील नवीन वाटचालीला सुरुवात करतात. असाच काहीसा प्रकार घडला आहे रिया चक्रवर्तीच्या आयुष्यात.
बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय झाली आहे. सुशांतच्या मृत्युनंतर तिच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. त्या सर्वांवर मात करत तिने स्वतःला सावरले आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ती नेहमी काही ना काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत, चाहत्यांना खुश करत असते. सध्या तिचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Riya chakravarthi was seen doing yoga in the nature)
या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, रिया योगा करत आहे. मानसिक तणावामधून दूर राहण्यासाठी रोज योगा करावा, असे अनेक डॉक्टर सांगत असतात. अशात अभिनेत्री देखील योगा करत आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा हा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातलेला आहे. तसेच तिच्या आजूबाजूला पूर्णतः हिरवळ दिसत असल्याने, ती कोणत्यातरी डोंगराळ प्रदेशात आहे असे वाटत आहे. तिच्या मागे शांत वाहणारी नदी देखील पाहायला मिळत आहे. आपल्या रोजच्या धकाधकीच्या आणि कामातील गडबडीच्या आयुष्यातून तिने स्वतःसाठी वेळ काढला आहे.
रियाच्या या फोटोवर तिचे चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. तसेच तिच्या फोटोवर लाईक्सचा तुफान वर्षाव होत आहे. सुशांत सिंगच्या मृत्युनंतर अमली पदार्थांप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल झाला होता. यावेळी अनेक वृत्तांमध्ये ती चर्चेचा विषय बनली होती. या प्रकरणी तिला न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली होती. तसेच सोशल मीडियावर अनेकांनी तिला ट्रोल केले होते. तिच्या आयुष्यातील तो खूप कठीण काळ होता. चित्रपटांपासून देखील ती दुरावली होती. परंतु आता तिच्या आयुष्यात सर्व काही सुरळीत होत आहे.
नुकतीच अभिनेत्री ‘चेहरे’ या चित्रपटामध्ये झळकली होती. या चित्रपटामध्ये दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मीने देखील अभिनय केला आहे. तसेच या चित्रपटामध्ये सिद्धांत कपूर, अन्नू कपूर, धृतिमान चटर्जी आणि रघुबीर यादव आदी कलाकार होते. हा चित्रपट ऑगस्ट महिन्यामध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटामध्ये रसिक प्रेक्षकांनी रियाच्या अभिनयाचे भरपूर कौतुक केले होते. पुन्हा एकदा तिला मोठ्या पडद्यावर पाहून तिचे चाहते खूप आनंदी झाले होते. लवकरच ती आपल्या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनोरंजन करणार आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-KBC: ‘शानदार शुक्रवार’च्या भागात ‘या’ खेळाडूंनी लावले चारचांद, अमिताभ यांना अश्रू अनावर
-Bigg Boss OTT: राकेश अन् शमिताच्या वाढत्या जवळीकतेबद्दल बोलली पूर्व पत्नी, ‘अशी’ दिली प्रतिक्रिया