करण जोहर सूत्रसंचालित ‘बिग बॉस ओटीटी’च्या ट्रॉफीवर दिव्या अग्रवालने स्वतःचे नाव कोरले आहे. त्यामुळे बिग बॉसच्या सर्व चाहत्यावर्गामध्ये आनंदाची लाट आल्याचे पाहायला मिळत आहे. अशात दिव्याच्या विजयाने ‘बिग बॉस ओटीटी’ संपले असून आता लवकरच सलमान खान सूत्रसंचालित ‘बिग बॉस’ १५ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा आनंद आणि उत्साह द्विगुणित झाला आहे.
‘बिग बॉस’ १५ च्या प्रीमियरची तारीख जाहीर करण्यात आली आहे. निर्मात्यांनी ३ ऑक्टोबर ऐवजी २ ऑक्टोबरलाच १५व्या पर्वाचा शुभारंभ करण्याचे ठरवले आहे. त्यासह या शोसाठी एका नवीन आणि अनोख्या गोष्टीची देखील घोषणा करण्यात आली आहे. (Salman Khan Big Boss 15 released date declared know when where and how you will be able to watch this show)
यावेळी ‘बिग बॉस’च्या घरात जंगल ही थीम असणार आहे. तसेच स्पर्धकांना जंगलातील अडचणींचा सामना करत जंगल पार करावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. यंदा इथे येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला झोपण्यापासून ते इतर अन्य गोष्टींसाठी देखील संघर्ष करावा लागणार असल्याचं म्हटलं जातंय. ‘बिग बॉस’ १५ शनिवारी (२ ऑक्टोबर) रात्री ९.३० वाजता कलर्स चॅनलवर सलमान खानसह प्रेक्षकांच्या मनोरंजनात सज्ज होणार आहे. या १५ व्या पर्वासह अभिनेत्री रेखा देखील जोडली जाणार आहे. ती शोमध्ये ‘ट्री ऑफ फॉर्च्यून’चा एक हिस्सा आहे.
निर्मात्यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “प्रत्येक पर्वामध्ये एक नवीन ट्वीस्ट, बिग बॉसच्या या पर्वामध्ये देखील स्पर्धकांसाठी आहेत नवीन समस्या. प्रवास असेल त्यांचा पण मनोरंजन असेल तुमचं, तर मग तयार आहात ना… ‘बिग बॉस’१५ च्या प्रीमियर साठी. बिग बॉस सोमवार ते शुक्रवार रात्री १०. ३० वाजता आणि शनिवार – रविवार रात्री ९. ३० वाजता फक्त कलर्सवर.”
‘बिग बॉस’च्या १५ व्या पर्वात येणाऱ्या अनेक कलाकारांची नावे समोर येत आहेत. अशात यामध्ये प्रतीक सहजपालने १५ व्या पर्वाचे पहिले तिकीट मिळवले आहे. तसेच या शोमध्ये येणाऱ्या सर्व स्पर्धकांना काही दिवस कॉरंटाईन देखील केले गेले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘बोले तो एकदम कडक!’ अरशद वारसीचे ‘बॉडी ट्रान्सफॉर्मेशन’ पाहून थेट जॉन सीनाशी केली जातेय तुलना
-भारीच ना! निशांत अन् शमिताला धूळ चाखवत दिव्या ठरली ‘बिग बॉस ओटीटी’ची उपविजेती