Wednesday, March 12, 2025
Home बॉलीवूड फोटो शेअर करून चाहत्यांना ‘फिटनेस गोल’ देतेय जान्हवी कपूर; वर्कआउट पाहून तुम्हीही कराल कौतुक

फोटो शेअर करून चाहत्यांना ‘फिटनेस गोल’ देतेय जान्हवी कपूर; वर्कआउट पाहून तुम्हीही कराल कौतुक

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने आपल्या फिटनेस आणि बॉल्डनेसने चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. जान्हवी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करते. ती तिच्या वर्कआउट सत्रांमध्ये ज्या प्रकारचा उत्साह दाखवते, ते चाहत्यांना खूप आवडते. ती अनेकदा तिच्या वर्कआउटचे फोटो शेअर करते, जे पोस्ट होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. शुक्रवारी (१८ सप्टेंबर) रोजी जान्हवीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन असेच काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळून राहिल्या.

जान्हवी एका प्रोफेशनलप्रमाणे सहजपणे स्ट्रेचिंग व्यायाम करताना दिसते. या फोटोमध्ये तिने जांभळ्या रंगाचा पोशाख घातला आहे. जान्हवीचे हे फोटो तिच्या चाहत्यांसाठी खूप प्रेरणादायी दिसत आहेत. साहजिकच तिच्या सौंदर्याचे रहस्य तिच्या वर्कआउट रूटीनमध्ये दडलेले आहे. तिने हे फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत, ज्यावर जवळपास ६ लाखहून अधिक लाईक्स आले आहेत. चाहत्यांसह कलाकारही तिच्या फोटोंवर जोरदार कमेंट करत आहेत. (viral social janhvi kapoor share her photos and gave fitness goals to the fans told the secret of her beauty)

त्याचबरोबर जान्हवी कपूर आपल्या तंदुरुस्ती आणि आपल्या आरोग्याबाबत खूप जागरुक असते. तिचे हे फोटो पाहून चाहते आपली प्रतिक्रिया देत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. जान्हवी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते आणि चाहत्यांसाठी तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यातील काही झलक शेअर करत राहते. यावरून हे स्पष्ट आहे की, ती चाहत्यांशी संवाद साधण्याची कोणतीही संधी सोडत नाही.

त्याचबरोबर जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर जान्हवीने रुपेरी पडद्यावर ‘धडक’ या चित्रपटातून पहिले पाऊल ठेवले होते. त्यानंतर ती शेवटची राजकुमार राव आणि वरुण शर्मासोबत ‘रुही’ या चित्रपटात दिसली होती. त्याचबरोबर सध्या ती सिद्धार्थ सेनगुप्ता दिग्दर्शित ‘गुड लक जेरी’ या चित्रपटात काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बोले तो एकदम कडक!’ अरशद वारसीचे ‘बॉडी ट्रान्सफॉर्मेशन’ पाहून थेट जॉन सीनाशी केली जातेय तुलना

-‘बिग बॉस १५’साठी सलमान खान घेतोय ‘इतकी’ रक्कम; कोटीच्या मानधनामुळे अभिनेता आला ट्रोलर्सच्या निशाण्यावर

-भारीच ना! निशांत अन् शमिताला धूळ चाखवत दिव्या ठरली ‘बिग बॉस ओटीटी’ची उपविजेती

हे देखील वाचा