बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाने सोडलेली छाप आज ही लोकांच्या मनात जिवंत आहे. काही कलाकार हे आजही त्याच्या विशिष्ट भूमिकेसाठी ओळखले जातात. अनेक असेही कलाकार आहेत, जे या क्षेत्रात अभिनेता होण्यासाठी आले होते, परंतु त्यांना खलनायकाची भूमिका करावी लागली. ते आजही खलनायकाच्या भूमिकेसाठीच ओळखले जातात. याच खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले एक कलाकार आहेत. जे कालांतराने रुपेरी पडद्यापासून दूर गेले. परंतु त्यांनी आपला वारसा असाच पुढे अविरत सुरू ठेवला आहे.
ते म्हणजे दिग्गज अभिनेते आहेत शक्ती कपूर. शक्ती कपूर यांनी आपला अभिनयाचा वारसा मुलगी श्रद्धा कपूर आणि मुलगा सिद्धांत कपूर यांना दिला आहे. याच्या आधारावर श्रद्धाने बॉलिवूडमध्ये आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे. इतकेच नव्हे तर ती अव्वल स्थानावर आहे. तर मुलगा सिद्धांत हा अजूनही आपले स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करत आहे. असे अनेक लोक आहे त्यांना श्रद्धा ही शक्ती कपूर यांची मुलगी आहे हे माहिती आहे. मात्र त्यांचा मुलगा कोण आहे हे अजूनही माहीत नाही. (shakti kapoor shared picture of his son siddhant kapoor person asked ye kab hua)
‘हा कधी झाला?’
अभिनेते शक्ती कपूर हे सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसतात. परंतु ते आपल्या मुलाला नेहमी प्रमोट करत असतात. त्याला प्रमोट करायची एकही संधी ते सोडत नाहीत. इतके करूनही सिद्धांतला अजूनही त्याची ओळख मिळवता आली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे एकदा शक्ती कपूर यांनी मुलाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तो फोटो पाहून चक्क चाहत्यांनी विचारलं की, ‘हा कधी झाला?’
सहाय्यक दिग्दर्शक होता सिद्धांत
बॉलिवूडमध्ये सिद्धांतला फारशी ओळख मिळाली नाही, जशी बहीण श्रद्धा कपूर आणि वडील शक्ती कपूर यांना मिळाली आहे. मात्र त्याने अनेक छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे तो एक देखाव्याचा भाग बनला आहे. तो एका दिग्गज कलाकाराचा मुलगा असूनही त्याने डिस्क जॉकी म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. त्याचबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सिद्धांतने ‘भूल भूलैया’, ‘भागम भाग’, ‘चुप चुप के’, ‘ढोल’ इत्यादी चित्रपट केले.
अभिनेता म्हणून सिद्धांतचे चित्रपट
सिद्धांतने अभिनय क्षेत्रातही आपला हात आजमावला आहे. परंतु त्याला बहिणीप्रमाणे छाप सोडता आली नाही. सिद्धांतने अभिनेता म्हणून ‘शुटआउट ऍट वडाला’ या चित्रपटातून पदार्पण केले. यामध्ये अभिनेते अनिल कपूर, कंगना रणौत आणि जॉन अब्राहम हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. यानंतर, सिद्धांत अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘अग्ली’ या मानसशास्त्रीय थ्रिलर चित्रपटात दिसला. त्याचबरोबर त्याने बहीण श्रद्धा कपूरसोबत रुपेरी पडद्यावर काम केले. ‘हसीना पारकर’ या चित्रपटात हे दोघं एकत्र दिसले होते. या चित्रपटात श्रद्धाने दाऊदच्या बहिणीची भूमिका साकारली, तर सिद्धांतने चित्रपटात दाऊदची भूमिका साकारली होती. परंतु या भावंडांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.
वेबसीरिजमध्येही केलंय काम
काही दिवसांपूर्वीच सिद्धांत कपूर ‘चेहरे’ चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट एक गुपित-थ्रिलरचे मिश्रण आहे. ही कथा मित्र ग्रुपवर आधारित आहे. सिद्धांत कपूर व्यतिरिक्त, दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन, इमरान हाशमी, क्रिती खरबंडा, रिया चक्रवर्ती, धृतमन चक्रवर्ती, रघुबीर यादव, समीर सोनी आणि अन्नू कपूर देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. याशिवाय त्याने ‘भौकाल’ नावाच्या वेब सीरिजमध्येही काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘बोले तो एकदम कडक!’ अरशद वारसीचे ‘बॉडी ट्रान्सफॉर्मेशन’ पाहून थेट जॉन सीनाशी केली जातेय तुलना
-भारीच ना! निशांत अन् शमिताला धूळ चाखवत दिव्या ठरली ‘बिग बॉस ओटीटी’ची उपविजेती