Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

अभिज्ञा भावेचे स्टायलिश कॉर्पोरेट लूकमधील फोटो व्हायरल, पाहून तुम्हीही म्हणाल, ‘भारीच की!’

मराठी टेलिव्हिजनवर काम करून रसिकांच्या मनात अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने तिची खास जागा निर्माण केली आहे. प्रत्येक मालिकेतील तिची पात्र प्रेक्षकांना खूप आवडतात. सोशल मीडियावर देखील ती बऱ्यापैकी सक्रिय असते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात. तिचे चाहते देखील तिच्या पोस्टला भरभरून प्रतिसाद देत असतात. अशातच तिचा एक नवीन लूक समोर आला आहे. ज्याला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे.

अभिज्ञाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही कार्पोरेट लूकमधील फोटो शेअर केले आहेत. तिने पांढऱ्या रंगाचे ब्लेझर आणि ट्राऊझर घातले आहे. तिच्या या ड्रेसवर वेगवेगळ्या रंगाच्या कापडाचे पॅचेस लावले आहेत. त्यामुळे तिच्या या ड्रेसला एक वेगळाच लूक आला आहे. यासोबत तिने पायात पांढऱ्या रंगाचे शूज घातले आहेत. सगळे केस मोकळे सोडून कॉर्पोरेट मेकअप केला आहे. (Marathi actress abhidnya bhave share her corporate look photos on social media)

हे फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “पुढे जात राहा, तुम्हाला तुमचा मार्ग नक्की मिळेल.” तिने शेअर केलेल्या या फोटोवर अक्षया देवधर हिने “वाव,” अशी कमेंट केली आहे, तर सुबोध भावेने हार्ट ईमोजी पोस्ट केल्या आहेत. तसेच अन्विता फलटणकरने “ओह गॉड,” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिचा हा वेगळा अंदाज सर्वांनाच खूप आवडला आहे.

अभिज्ञाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘खुलता कळी खुलेना’, ‘तुला पाहते रे’, ‘रंग माझा वेगळा’, लगोरी’, ‘देवयानी एक्का राजा राणी’, ‘लव्ह यू जिंदगी’, ‘प्यार की ये कहाणी’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ती सध्या ‘पवित्र रिश्ता २.०’ या मालिकेत अंकिता लोखंडेसोबत काम करत आहे. तसेच तिने काही दिवसांपूर्वी ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राखी सावंतला पती रितेशचा पाठिंबा, राघव चड्ढांच्या ‘या’ विधानावर घेतली त्यांची शाळा

-बाकीच्या पर्वांपेक्षा खास आहे हे पर्व; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसं बघू शकाल सलमानचा ‘बिग बॉस’

-फोटो शेअर करून चाहत्यांना ‘फिटनेस गोल’ देतेय जान्हवी कपूर; वर्कआउट पाहून तुम्हीही कराल कौतुक

हे देखील वाचा