‘बिग बॉस मराठी ३’ या बहुप्रतिक्षिप्त शोची नुकतीच सुरुवात झाली आहे. या शोमध्ये आता एक-एक स्पर्धकांचा प्रवेश होत आहे. या शोची मागील दोन वर्षांपासून सगळेच आतुरतेने वाट बघत होते. अशातच या शोचा ग्रँड प्रिमिअमची सुरुवात झाली आहे. या शोमध्ये सोनाली पाटील आणि विशाल निकम या दोन स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे.
अशातच आणखी स्पर्धकांची देखील एन्ट्री होत आहे. शोमध्ये अभिनेत्री स्नेहा वाघ हिची एन्ट्री झाली आहे. स्नेहा ही टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने ‘परमसुंदरी’ या सुपरहिट गाण्यावर डान्स करत दणक्यात प्रवेश केला आहे. तिने अनेक मराठी तसेच हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तिने हिंदीमधील ‘चंद्रगुप्त मौर्य’, ‘विरा’, ‘ज्योती’, ‘मेरे साई’ या मालिकांमध्ये काम केले आहे. (Bigg Boss Marathi 3 grand premium starting, contestant enter in BBM house)
या शोमध्ये चौथ्या क्रमांकाला ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील आपल्या सगळ्यांची लाडकी मोमो म्हणजे मीरा जगन्नाथ हिचा प्रवेश झाला आहे. मीरा ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. या मालिकेतून ती घराघरात पोहोचली आहे. तसेच नुकतेच काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस मराठी २’ चा स्पर्धक शिव ठाकरे याच्यासोबत तिचे ‘शीलावती’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे.
‘बिग बॉस मराठी ३’ मध्ये मराठी संगीत क्षेत्रातील दिग्गज गायक आनंद शिंदे यांचा मुलगा डॉक्टर उत्कर्ष शिंदे याचा प्रवेश झाला आहे. या शोमध्ये प्रवेश करताना त्याच्यासोबत त्याचा भाऊ आणि सगळ्यांचा लाडका गायक आदर्श शिंदे हा त्याला शुभेच्छा देण्यासाठी आला होता.
शोमध्ये पुढचा प्रवेश अविष्कार दारव्हेकर याचा प्रवेश झाला आहे. अविष्कारने या आधी अनेक मालिका तसेच चित्रपटात काम करून त्याचे नाव कमावले आहे. त्याने ‘आभाळमाया’, ‘तू माझा सांगाती’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच त्याने ‘ती आणि इतर’, ‘किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-गुलाबी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये अन्विता दिसतेय एकदम ‘बार्बी डॉल’, कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
-अभिज्ञा भावेचे स्टायलिश कॉर्पोरेट लूकमधील फोटो व्हायरल, पाहून तुम्हीही म्हणाल, ‘भारीच की!’
-गुलाबी साडी नेसून आर्चीने घेतली ‘मिरर सेल्फी’; चाहत्यांना भावतोय अभिनेत्रीचा सोज्वळ अंदाज