बॉलिवूडचे दिग्गज चित्रपट निर्माते महेश भट्ट यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. मागील अनेक वर्ष त्यांनी आपल्या या हिट चित्रपटामुळे बॉलिवूडचे नाव मोठे करायला मदत केली. त्याचबरोबर अनेक कलाकारांना ओळख मिळवून दिली. महेश भट्ट यांनी मागील अनेक दशकांपासून बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसोबत चित्रपट केले आहेत. त्याचबरोबर त्यांनी आपल्या चित्रपटाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
दिग्गज चित्रपट निर्माते महेश भट्ट यांचा सोमवारी (२० सप्टेंबर) वाढदिवस आहे. महेश भट्ट हे आपला ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. त्याचबरोबर त्यांच्या मुलीकडून त्यांना एक सरप्राइज मिळाले आहे. त्यांच्या वाढदिवसाला मिड नाईट बर्थडे सेलिब्रेशन देखील झाले. याच सेलिब्रेशनचे काही फोटो त्यांची मुलगी आणि निर्माती पूजा भट्टने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. पूजाने केकचा फोटो देखील शेअर केला आहे. त्याचबरोबर महेश यांच्या पत्नी सोनी रझदान यांनी ही केकचा फोटो शेअर करून आपल्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये महेश यांच्या आजूबाजूला खूप फुगे आहे. त्याचबरोबर लहान मुलगी आलिया भट्ट देखील होती. इतकेच नव्हे तर तिचा बॉयफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर देखील या फोटोमध्ये दिसत आहे. (mahesh bhatt birthday alia bhatt pooja bhatt celebrated her fathers birthday at midnight)
फोटोमध्ये महेश भट्ट हे त्यांच्या दोन मुली पूजा आणि आलिया तसेच रणबीरसोबत पोज देत आहे. याचबरोबर पूजा भट्टने महेश भट्ट आणि आलियाचे फोटो शेअर करत लिहिले की, “बर्थडे बॉय … पण सेटिंग गर्लला मिस करू नका!” या फोटोमध्ये, महेश भट्ट काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि डेनिम्स घातलेले दिसून येत आहेत. तर आलिया वडिलांच्या मागे फुगे घेऊन बसली आहे आणि ती जल्लोष करताना दिसत आहे. या गुलाबी रंगाच्या फुग्यांवर ‘सिम्प्लिसिटी’ आणि ‘हॅपी बर्थडे पॉप्स’ असे लिहिलेले आहेत.
पूजा भट्टने केलेल्या या पोस्टवर महेश भट्ट यांच्या चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीमधील त्यांच्या मित्रांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये अभिनेता जॅकी श्रॉफने लिहिले की, “बॉस नेहमी आनंदी रहा.” तर सुनील शेट्टीने यांना शुभेच्छा देत लिहिले की, “भट्ट साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.” त्याचबरोबर पूजा भट्टने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला केकचा एक फोटो ही शेअर केला आहे. केक खूप सुंदर दिसतोय. केकच्या शेजारी एक मेणबत्ती देखील लावली आहे. त्याच दरम्यान, सोनी रझदान यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर केकच्या संपूर्ण सेटअपचा एक फोटो देखील शेअर केला आहे. त्याचबरोबर कॅप्शनमध्ये लिहिले की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा डार्लिंग.”
महेश भट्ट यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी मागच्या वर्षी ‘सडक २’ या चित्रपटातून दिग्दर्शनात पुनरागमन केले होते. या चित्रपटात आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, पूजा भट्ट आणि संजय दत्त हे मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. पण या चित्रपटाला फारशी कमाल करता आली नाही.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-साधना शिवदासानी जगल्या ‘अशा’ प्रकारचे जीवन, ‘या’ कारणास्तव ठोकला होता अभिनयक्षेत्राला राम राम!