बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याने कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्य लोकांना मदतीचा हात दिला होता. तो नेहमीच गरिबांची मदत करण्यास सज्ज असतो. अलिकडेच आयकर विभागाने सोनू सूदच्या घरावर छापा टाकल्यामुळे तो चर्चेत आला आहे. माध्यमांतील वृत्तांमध्ये दावा केला जात आहे की, छाप्यादरम्यान त्याच्या घरात टॅक्सची हेराफेरी केल्याचे पक्के पुरावे मिळाले आहेत. आयकर विभागाच्या पथकाने मुंबई, लखनऊ, कानपूर, जयपूर, दिल्ली आणि गुरुग्राम येथे एकाच वेळी छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे.
या दरम्यान नुकतीच सोनू सूदने एक प्रेरणादायी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तो खूप आत्मविश्वासाने भरलेला दिसत आहे. ही पोस्ट त्याचा मजबुत हेतू आणि सामान्य लोकांचा पाठिंबा दर्शवत आहे. त्याने ट्वीट करत लिहिले की, “कठीण प्रवासातही सहज प्रवास होतो, प्रत्येक भारतीयांच्या प्रार्थनेचा परिणाम आहे असे वाटते.” यासोबत त्याने एक पोस्टर देखील शेअर केले आहे. पोस्टरच्या बॅकग्राउंडवर तीन रंग आहेत, जसे भारतीय ध्वजाला तीन रंग असतात.
“सख्त राहों में भी आसान सफर लगता है,
हर हिंदुस्तानी की दुआओं का असर लगता है” ???? pic.twitter.com/0HRhnpf0sY— sonu sood (@SonuSood) September 20, 2021
सोनू सूदने या पोस्टमध्ये असे लिहिले की, “आपल्याला नेहमी आपली बाजू स्पष्ट करण्याची गरज नाही. ते वेळच सांगेल. मी माझ्या मनापासून आणि संपूर्ण शक्तीने भारताच्या लोकांची सेवा करण्याचे वचन दिले होते. माझ्या फाउंडेशनचा प्रत्येक रुपया एक मौल्यवान आयुष्य वाचवण्यासाठी आणि गरजूंना मदत करण्यासाठी खर्च केला जातो. तसेच, अनेक प्रसंगी, मी ब्रँडला जाहिरातीचे मानधन मानवी घटकांमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे, जेणेकरून आम्ही लोकांना मदत करत राहू. ”
सोनू सूदने पुढे लिहिले की, “मी काही दिवसांपासून पाहुण्यांची सेवा करण्यात थोडा व्यस्त आहे. ज्यामुळे मी तुमची सेवा करू शकत नाही. मी पुन्हा ४ दिवसांनी पूर्ण नम्रतेने परत आलो आहे. मी पुन्हा तुमच्या सेवेत आलोय, आयुष्यभरासाठी.” सोनू सूदने पुढे लिहिले की, “चांगले केले तर चांगले होईल. शेवटी चांगल्याचे चांगले होते. माझा प्रवास चालू आहे… जय हिंद. सोनू सूद.”
या छाप्यात आयकर विभागाला प्रचंड टॅक्स चोरीचे सबळ पुरावे मिळाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. टॅक्स चोरी सोनू सूदच्या वैयक्तिक संपत्तीशी संबंधित आहे. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्याने बनावट कंपन्यांच्या माध्यमातून आपले बेहिशोबी उत्पन्न वळवले आहे. आतापर्यंतच्या तपासात टीमला २० बनावट नोंदी सापडल्या आहेत. आयकर विभाग सोनू सूदच्या चॅरिटी फाउंडेशनच्या खात्यांचीही चौकशी करत आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-साधना शिवदासानी जगल्या ‘अशा’ प्रकारचे जीवन, ‘या’ कारणास्तव ठोकला होता अभिनयक्षेत्राला राम राम!










