Wednesday, January 21, 2026
Home साऊथ सिनेमा पायल घोषवर अज्ञातांनी केला ॲसिड हल्ल्याचा प्रयत्न? फोटो शेअर करत अभिनेत्रीने केला दावा

पायल घोषवर अज्ञातांनी केला ॲसिड हल्ल्याचा प्रयत्न? फोटो शेअर करत अभिनेत्रीने केला दावा

मुंबईमधील अंधेरी परिसरातील प्रसिद्ध अभिनेत्री पायल घोषला अज्ञात हल्लेखोरांनी इजा करण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर ॲसिड ओतण्याचाही प्रयत्न केला असल्याचा दावा अभिनेत्रीने केला आहे. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, ती मुंबईच्या अंधेरी भागातून घरी परतत होती. ती तिच्या कारमध्ये बसणार होती, तेव्हा अचानक तिच्यावर कोणीतरी हल्ला केला. अभिनेत्रीने सांगितले की, त्या व्यक्तीकडे ॲसिडही होते आणि त्याचा चेहरा मास्कने झाकलेला होता. अभिनेत्रीच्या हाताला थोडीफार दुखापत झाली आहे.

अभिनेत्रीने सांगितली संपूर्ण कहाणी
पायलने सांगितले की, “मी माझ्या ड्रायव्हिंग सीटवर बसणार होते आणि अचानक काही लोकांनी ॲसिड हातात घेऊन माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी मदतीसाठी आरडाओरडा केला आणि ते लोक तेथून पळून गेले. त्यांनी माझ्या डोक्यात रॉडने मारले पण सुदैवाने डोक्याला इजा झाली नाही. त्याने मला हातावरही मारले. मी त्याचा चेहरा पाहू शकले नाही. मी माझ्या भावासोबत जाऊन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करेन.

 

अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा केला होता आरोप
अभिनेत्री पायल घोषने प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप करून सर्वत्र खळबळ उडवून दिली होती. यासाठी तिने पंतप्रधान मोदींकडून ट्वीटद्वारे मदतही मागितली होती. ही बाब काही वर्षे जुनी असल्याचे सांगितले जात असले, तरी कश्यपने हे आरोप फेटाळून लावले होते. या आरोपांच्या संदर्भात पोलिसांनी अनुराग कश्यपची चौकशी देखील केली होती.

 

पायलचा जन्म १३ नोव्हेंबर १९८९ रोजी कोलकता येथे झाला. कोलकत्याच्या स्कॉटिश चर्च कॉलेजमधून तिने पॉलिटिकल सायन्समध्ये पदवी मिळवली. २००८ मध्ये सीन बीन स्टारर ब्रिटीश टीव्ही फिल्म ‘शार्प्स पेरिल’मध्ये देखील तिने भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिला एक छोटीशी भूमिका मिळाली होती. याच्या ऑडीशनसाठी ती आपल्या एका मित्रासोबत गेली होती. यात तिने एका बंगाली फ्रीडम फाइटरच्या मुलीची भूमिका साकारली होती, जी खेड्यात राहते. त्यानंतर ती ‘प्रायनम’, ‘वर्षाधरे’ आणि ‘मिस्टर रास्कल’ यासह अनेक तेलुगू आणि कन्नड या चित्रपटांमध्ये दिसली.

 

 

हे देखील वाचा