Sunday, January 18, 2026
Home बॉलीवूड ब्रेकिंग न्यूज! तब्बल दोन महिन्यांनंतर शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याची जामिनावर सुटका

ब्रेकिंग न्यूज! तब्बल दोन महिन्यांनंतर शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याची जामिनावर सुटका

प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा हा मागील दोन महिन्यांपासून खूप चर्चेत आहे. अश्लील चित्रपटाचे चित्रीकरण करून ते ऑनलाईन ऍपद्वारे प्रदर्शित केल्याप्रकरणी त्याला १९ जुलैला पोलिसांनी अटक केले होते. या घटनेनंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली होती. एवढंच काय तर त्याच्या या व्यवसायात पत्नी शिल्पा शेट्टी हिचा देखील हातभार आहे किंवा तिला त्याच्या या व्यवसायाबाबत पूर्वकल्पना होती असा‌ देखील तिच्यावर आरोप करण्यात आला होता. यामुळे अनेक दिवस ती सोशल मीडिया, तसेच टेलिव्हिजनपासून दूर होती. तसेच तिच्या कुटुंबाची देखील या दरम्यान खूप हेळसांड झाली होती. नुकतेच हाती आलेल्या माहितीनुसार व्यावसायिक राज कुंद्रा याला जामीन मिळाला आहे.

माध्यमातील वृत्तानुसार मुंबई उच्च न्यायालयाकडून राज कुंद्राला जामीन मिळाला आहे आणि तो त्याच्या घरी परतणार आहे. तब्बल दोन महिने तो जेलमध्ये बंद होता. या दरम्यान त्याला अनेक अडचणींना समोर जावे लागले आहे. त्याच्या घराची तसेच ऑफिसची देखील तपासणी करण्यात आली आहे. यासोबत अनेक अभिनेत्रींनी देखील त्याच्यावर गंभीर आरोप लावले होते. त्यामुळे त्याच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली होती. (Bollywood actress shilpa Shetty’s husband raj Kundra get bell from jail after two months)

https://www.instagram.com/p/CUCwUtUg_wT/?utm_source=ig_web_copy_link

राज कुंद्रा याने अश्लील चित्रपट बनवून ते ऑनलाईन ऍपवर दाखवल्या प्रकरणी त्याला अटक केली होती. क्राईम ब्रांचच्या माहितीनुसार, राज कुंद्राने त्याच्या या बिझनेसमध्ये १० कोटी रुपये गुंतवले होते. खरंतर फेब्रुवारी महिन्यातच या गोष्टीची माहिती मिळाली होती की, राज कुंद्राच्या कंपनीचा या सगळ्यांशी काहीतरी संबंध आहे. पण तसा ठोस पुरावा मिळाल्यानंतर त्याला अटक केले गेले.

फेब्रुवारी २०२१ मध्ये केलेल्या तपासावरून हे समोर आले होते की, राज कुंद्राची कंपनी काही छोट्या कलाकारांना वेबसीरिजमध्ये तसेच शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्यासाठी आमिष दाखवते. त्यानंतर त्यांच्याकडून ऑडिशनच्या नावाखाली काही शॉट्स करून घेतले जात होते. यामध्ये ते कलाकारांना तुम्हाला थोडा बोल्ड सीन करावा लागेल असे सांगायचे.

 

 

हे देखील वाचा