‘बिग बॉस मराठी ३’ हा बहुप्रतीक्षित शो रविवारी (१९ सप्टेंबर) चालू झाला आहे. शोमध्ये यावर्षी १४ स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. तसेच स्पर्धकांचा पहिल्या दिवसाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी घरात वादाची ठिणगी पडली आहे. या आठवड्यात बिग बॉसने एक खास थीम ठेवली आहे. हा आठवडा महिला स्पेशल असणार आहे. म्हणजेच महिला या घरातील काही परिसराच्या मालकीण असणार आहेत आणि पुरुष हे त्यांचे सेवक असणार आहेत. म्हणजेच महिला त्यांच्या भागातील त्यांच्या सेवकांना जे काही काम सांगतील ते पुरुषांना करावे लागणार आहे. यातच मिरा जगन्नाथ आणि जय दुधाने यांच्यात वादावादी झालेली दिसून आली.
मीरा ही बेडरुमची मालकीण आहे. तर आविष्कार आणि उत्कर्ष हे तिचे सेवक आहेत. यावेळी ते दोघे बेडरूममधील सगळे बेडशिट नीट घड्या घालून ठेवत होते. तर मिरा त्या दोघांना सांगते की, जे लोक रिकामे बसले आहेत त्यांना त्यांचं काम करायला सांगा म्हणजेच तेवढचं तुम्हाला सोप्पं जाईल. (Bigg Boss Marathi 3, argument between meera jagnnath and jay dudhane)
यानंतर जयच्या बेडवर टॉवेल पडलेला असतो. तेव्हा ती जयला सांगते की, “तुझा टॉवेल उचलून बाथरूममध्ये ठेव नाहीतर बेडमध्ये ठेव. मला इथे पसारा नकोय. नाहीतर माझे सेवक करतील ते. “यावर जय जातो आणि बेडवरील त्याचा टॉवेल उचलून ठेवतो आणि जाताना काही तरी अँक्शन करतो. यावर मिरा खूप चिडते आणि म्हणते “डोकं आहे मला माझ्यासमोर बोल” यावर जय म्हणतो की, “मी तुला काहीच बोललो नाही,” यावर मिरा म्हणते की, “मी स्वतः डोळ्यांनी पाहिलंय तू हातवारे केले ते. मी पण इथे किचनमध्ये येऊन भाजी फेकून देऊ शकते.” यावर घरातील इतर सदस्य देखील यामध्ये बोलतात. मीरा आणि जय यांच्यात चांगलीच वादावादी झाली.
अशाप्रकारे पहिल्याच दिवशी घरात वाद झाले आहेत. मीरा घरात आली तेव्हा देखील तिला सिंगल बेड हवा आहे यासाठी इतर स्पर्धकांसोबत वाद घातला होता. आता इथून पुढे जय आणि मिरामधील भांडण मिटेल की, येत्या दिवसात त्यांच्यातील वाद वाढतच राहतील हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-साधना शिवदासानी जगल्या ‘अशा’ प्रकारचे जीवन, ‘या’ कारणास्तव ठोकला होता अभिनयक्षेत्राला राम राम!