मराठी इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. सोमवारी (२०सप्टेंबर) अभिनेत्री ईश्वरी देशपांडे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या बातमीने सर्वांना दुःख झाले आहे. एवढ्या कमी वयात झालेल्या तिच्या निधनाने तिच्या कुटुंबीयांसोबत तिच्या अनेक चाहत्यांना देखील खूप दुःख झाले आहे. ईश्वरी केवळ २५ वर्षाची होती. ईश्वरीसोबत तिचा मित्र शुभम देगडे याचा देखील मृत्यू झाला आहे.
ही घटना सोमवारी (२० सप्टेंबर) पहाटे गोव्यातील बागा- कलांगुट येथे घडली आहे. येथील रस्ता अरुंद असल्याने शुभमचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी खाली खाडीत कोसळली. गाडी लॉक असल्याने दोघांच्याही नाका-तोंडात पाणी जाऊन त्यांचा मृत्यू झाला. सकाळी ७ वाजता अग्नीशमनदल तिथे पोहोचले आणि त्यांनी दोघांचे मृत्यदेह गाडीतून बाहेर काढले. (Marathi actress ishwari Deshpande’s death due to car accident)
ईश्वरीने नुकतेच एका हिंदी आणि मराठी चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. तसेच यापूर्वी तिने काही हिंदी मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका निभावल्या होत्या. ईश्वरी ही सोशल मीडियावर देखील खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय होती. तिने अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते.
ईश्वरीसोबत असणारा तिचा मित्र शुभम हे मागील अनेक दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. त्यांच्यात खूप चांगली मैत्री होती परंतु नंतर काही दिवसांनी त्यांच्या या मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले. अनेक महिन्यांपासून ते एकमेकांना डेट करत होते. तसेच हाती आलेल्या माहितीनुसार, शुभम आणि ईश्वरी पुढच्या आठवड्यात साखरपुडा करणार होते. मात्र, त्यांचा संसार सुरू होण्याआधीच नियतीने त्यांच्यासोबत खूप मोठा खेळ खेळला आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आनंद गगनात मावेना! आधी बॉलिवूडमध्ये पदार्पण अन् आता ‘मल्टीप्लेक्स’चा मालक बनलाय विजय देवरकोंडा
-कपाळावर कुंकू लावून तुरुंगातून बाहेर निघाला राज कुंद्रा, ६४ दिवसांनी मिळाला जामीन
-‘मला दिव्याने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले’, नेहाच्या वक्तव्यावर विजेतीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया