Thursday, April 24, 2025
Home अन्य धनश्री वर्माने अबूधाबी क्रिकेटच्या मैदानावरून शेअर केला क्लासी फोटो; फॅन्स म्हणाले, ‘कॅटरिना कैफ दिसते’

धनश्री वर्माने अबूधाबी क्रिकेटच्या मैदानावरून शेअर केला क्लासी फोटो; फॅन्स म्हणाले, ‘कॅटरिना कैफ दिसते’

क्रिकेट प्रेमींसाठी आयपीएलचे सामने वर्ल्डकप सामान्यांपेक्षा काही कमी नसतात. क्रिकेटचे भक्त आतुरतेने या सामन्यांची वाट बघत असतात. नुकतेच या आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. अबुधाबीमध्ये आयपीएलच्या उर्वरित सामन्यांची सुरुवात झाली आहे. दुबईमध्ये आपल्या क्रिकेटर्ससोबतच त्यांच्या पत्नी देखील गेल्या असून, त्या त्यांचे जबरदस्त फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे.

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज असणाऱ्या युजवेंद्र चहलची पत्नी यूटुबर धनश्री वर्माने देखील तिचे काही क्लासी फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा अंदाज बघण्याजोगा आहे. धनश्रीने अबूधाबीच्या मैदानातून तिचे काही फोटो शेअर केले आहे. या फोटोंमध्ये आपण पाहू शकतो की, क्रिकेट मैदानाच्या पॅव्हेलियनमध्ये उभी असून, तिच्या मागे क्रिकेटर्स सराव करताना दिसत आहे. धनश्रीचे हे फोटो पाहून तिच्या फॅन्सने तिची तुलना थेट कॅटरिना कैफसोबत केली आहे.

धनश्री वर्माने तिचे हे फोटो शेअर करताना लिहिले, “मैदानावर पार येऊन खूप छान वाटत आहे. खूपच उन्हाळा आहे. मात्र खेळाडूंना सलाम आहे.” तिने तिच्या पोस्टमधून एवढ्या कडक उन्हाळ्यात सराव करणाऱ्या खेळाडूंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. धनश्रीने या फोटोंमध्ये पाहिले तर पांढऱ्या रंगाचा शर्ट ब्लू रंगाची डेनिम घातली आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये ती खुर्च्यांवर बसलेली दिसत आहे.

धनश्रीच्या या फुटींवर तिच्या फॅन्सच्या एकापेक्षा एका कमेंट्स येत आहे. एका फॅनने लिहिले की, ‘तुझ्या येण्याने वातावरण अधिकच सुंदर झाले आहे.’ तर अजून एकाने लिहिले की, ‘कॅटरिना दिसत आहेस.’ तर काही फॅन्स तिला ट्रोल करताना देखील दिसत आहे. काहींनी लिहिले की, ‘तू चहलसाठी पनोती घेऊन आली आहेस.’, तर दुसऱ्याने आरसीबीच्या पराभवाचे खापर फोडत लिहिले, ‘ऍटिट्यूड कसला आहे ९४ रणांवर टीम ऑल आऊट झाली.’ तिच्या या फोटोना आतापर्यंत चार लाखांपेक्षा अधिक लाईक्स आले आहेत.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शाळेची फी भरण्यासाठी गुलशन ग्रोव्हर यांनी विकली डिटर्जेंट पावडर, मोठ्या संघर्षाने झाले बॉलिवूडचे ‘बॅडमॅन’

-कपूर घराण्याचे पाश तोडत केली बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तर ‘या’ कारणामुळे बेबोने राकेश रोशन यांना दिला होता डच्चू

-‘कन्यादाना’बद्दल बोलणे ‘बबली गर्ल’ला पडले भलतेच महागात, सोशल मीडियावर व्यक्त होतोय संताप

 

हे देखील वाचा