Wednesday, July 16, 2025
Home बॉलीवूड ‘कुछ कुछ होता है’मध्ये अंजलीचे पात्र साकारून जिंकली लाखो मने, तर आज हॉट अदांनी सना चाहत्यांना करते घायाळ

‘कुछ कुछ होता है’मध्ये अंजलीचे पात्र साकारून जिंकली लाखो मने, तर आज हॉट अदांनी सना चाहत्यांना करते घायाळ

बॉलिवूडमध्ये अनेक असे कलाकार आहेत, ज्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आणि आपल्या निरागसतेने सर्व प्रक्षेकांची मने जिंकली. शाहरुख खानचा चित्रपट ‘कुछ कुछ होता है’मधील ती छोट्या अंजलीची भूमिका साकारणारी मुलगी आठवते का? या चित्रपटातील बालकलाकार म्हणून काम करणारी अभिनेत्री सना सईद आता मोठी झाली आहे. सना तिच्या ग्लॅमरस लूकमुळे लाखो चाहत्यांची आवड बनली आहे. सनाने अभिनयाच्या जोरावर अनेक चाहत्यांच्या ह्रदयाची स्वत:चे स्थान निर्माण केले. चला तर मग पाहूयात सनाविषयी काही खास गोष्टी.

‘या’ टीव्ही मालिकांमध्ये सनाने केले काम 
सनाने तिच्या अभिनय कारकिर्दीत टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. तिने ‘सपना बाबुल का… बिदाई’, ‘बाबुल का आंगन छूटे ना’ यासारख्या मालिकेत काम केले. यासोबतच तिने रियॅलिटी शोमध्ये काम केले. ती ‘झलक दिखला’, ‘खतरों के खिलाडी ७’मध्ये दिसली. सनाने स्टार प्लसवरील ‘फाॅक्स किड्स’चे सुत्रसंचलनही केले. पण सनाला चित्रपटसृष्टीत काम करताना कुटुंबीयांचा पूर्णपणे विरोध होता.

चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी गेली कुटुंबाच्या विरोधात
सनाने चित्रपटसृष्टीत काम करु नये, अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. या कारणास्तव, सनाच्या वडिलांनी तिला अनेक वेळा बाॅलिवूडपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतू नंतर जेव्हा सना ‘स्टुंडंट ऑफ द इयर’मध्ये बिकिनी शूट केले, तेव्हा तिचे वडिल प्रचंड भडकले होते. मात्र, सनाने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि ती पुढे काम करत राहिली. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसले.

सनाने ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटानंतर ‘हर दिल जो प्यार करेगा’ आणि ‘बादल’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. सना बुधवारी (२२सप्टेंबर) ३३वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म २२सप्टेंबर १९८८ रोजी झाला. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करते. तिच्या फोटोवर चाहते कमेंट्स आणि लाईक्स करतात. तिचे बोल्ड फोटोशूटही खूप व्हायरल होते.

काही दिवसांपूर्वी सनाचे नाव दीपेश शर्मासोबत चर्चेत आले होते. त्यावेळी ‘नच बलिए’ मध्ये सनाने दीपेशसोबत काम केले. यानंतर सलामान खानचा मित्र इक्बाल रत्नासीचा मुलगा झहीर रत्नासीसोबत सनाचे नाव चर्चेत आले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच! कपाळी चंद्रकोर, नाकात नथ अन् केसात गजरा घालून स्मिता गोंदकर दिसतेय एकदम सुंदर

-‘पुरुषाचे शरीर’, म्हणणाऱ्या युजरला तापसी पन्नूचे खणखणीत प्रत्युत्तर; म्हणाली, ‘फक्त ही ओळ लक्षात ठेव…’

-लईच वाईट झालं! वयाच्या २५ व्या वर्षी मराठी अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा अपघातात मृत्यू

हे देखील वाचा