Saturday, January 11, 2025
Home बॉलीवूड बॉलिवूडमध्ये बिपाशाला पूर्ण झाले २० वर्ष, सोशल मीडियावर दिला पहिल्या सिनेमाच्या आठवणींना उजाळा

बॉलिवूडमध्ये बिपाशाला पूर्ण झाले २० वर्ष, सोशल मीडियावर दिला पहिल्या सिनेमाच्या आठवणींना उजाळा

बॉलिवूड स्वप्ननगरी. सर्वांचे स्वप्न सत्यात उतरावणारी ही मायानगरी सर्वांनाच तिची भुरळ घालत असते. या क्षेत्रात येऊन यश मिळवणे आणि स्वतःची ओळख निर्माण करणे हे खूप अवघड आहे. मात्र कलाकार मोठ्या संघर्षाने आणि मेहनतीने यश मिळवता. प्रत्येक कलाकारासाठी त्यांचा पहिला सिनेमा खूपच खास असतो. आयुष्यभर स्मरणात राहणारा पहिला सिनेमा आणि त्याच्या आठवणी कलाकार बऱ्याचदा शेअर करताना दिसतात.

बॉलिवूडची ‘बंगाली ब्युटी’ म्हणून ओळखली जाणाऱ्या बिपाशाने देखील नुकत्याच तिच्या पहिल्या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देताना तिला या इंडस्ट्रीमध्ये २० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सोशल मीडियावर एका पोस्ट शेअर केली आहे. बिपाशाने अब्बास मस्तान यांच्या ‘अजनबी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमाला प्रदर्शित होऊन २० वर्ष झाली आहेत. २१ सप्टेंबर २००१ साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.

याबद्दल बिपाशाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “हा पहिला दिवस होता जेव्हा प्रेक्षकांनी माझे त्यांच्या मनामध्ये स्थान देत स्वागत केले. २० वर्षांपूर्वी माझा पहिला सिनेमा ‘अजनबी’ २१ सप्टेंबर २००१ ला प्रदर्शित झाला होता. असे वाटतच नाही की, मला इंडस्ट्रीमध्ये येऊन एवढा मोठा काळ झाला आहे. मला फॅन्स, शुभचिंतक आणि मेडीकडून जे भरभरून प्रेम मिळाले आणि अजूनही मिळत आहे त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. ‘अजनबी’ नेहमीच माझ्यासाठी खास आहे. अब्बास मस्तान, दिग्दर्शक विजय गिलानी आणि अक्षय कुमार, बॉबी देओल, करीना कपूर सर्वच कलाकार, माझी पहिली टीम, माझे संपूर्ण युनिट सर्वांची आभारी आहे. या सिनेमाचा माझा संपूर्ण प्रवास खूपच अविस्मरणीय होता.”

बिपाशाने या सिनेमानंतर बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे दिले त्यात ‘जिस्म’, ‘राज’, ‘अपहरण’, ‘ओमकारा’, ‘नो एंट्री’, ‘कॉपोर्रेट’, ‘धूम २’ आदी चित्रपटांचा समावेश आहे. बिपाशाने अभिनयसोबतच तिच्या बोल्ड आणि मादक अदांनी देखील सर्वांना घायाळ केले आहे. बॉलिवूडमधील फिट अभिनेत्रींच्या यादीत बिपाशाचा नंबर वरचा लागतो.

बिपाशाने २०१६मध्ये टीव्ही आणि चित्रपट अभिनेता करण सिंग ग्रोव्हरसोबत लग्न केले. त नेहमीच तिचे आणि करणचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या बिपाशा जरी चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी तिची क्रेझ आणि लोकप्रियता अजिबात कमी झाली नाही.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच! कपाळी चंद्रकोर, नाकात नथ अन् केसात गजरा घालून स्मिता गोंदकर दिसतेय एकदम सुंदर

-‘पुरुषाचे शरीर’, म्हणणाऱ्या युजरला तापसी पन्नूचे खणखणीत प्रत्युत्तर; म्हणाली, ‘फक्त ही ओळ लक्षात ठेव…’

-लईच वाईट झालं! वयाच्या २५ व्या वर्षी मराठी अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा अपघातात मृत्यू

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा