बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्राबाबत मोठी बातमी समोर येत आहे. मागील २ महिने तुरुंगात असलेल्या राजला सोमवारी (२० सप्टेंबर) ५०,००० रुपयांवर जामीन मंजूर झाला आहे. त्यानंतर राज मंगळवारी (२१ सप्टेंबर) तुरुंगातून त्याच्या घरी परतला आहे. त्याच्यासोबतच अश्लील चित्रपट प्रकरणातील त्याचा साथीदार आणि प्रकरणातील आरोपी रायन थोर्पे याला देखील जामीन मंजूर झाला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने १५०० पानांचे आरोपपत्र दाखल केल्यानंतर ६ दिवसानंतर न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केला आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाने न्यायालयात असा युक्तिवाद केला होता की, राज कुंद्राला सोडणे योग्य नाही. कारण तो पुराव्यांशी छेडछाड करू शकतो. त्याचवेळी पोलिसांनी तो देश सोडून जाण्याची भीती देखील व्यक्त केली होती. माध्यमांतील वृत्तानुसार, न्यायालयाच्या आदेशानुसार तपास अधिकाऱ्याने दंड संहितेच्या कलम १६४ अन्वये साक्षीदारांचे सर्व जबाब नोंदवले होते. ज्यात सांगण्यात आले होते की, वियान इंडस्ट्रीजचे लॅपटॉप आणि मोबाईल अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता कमी आहे.
#RajKundra was planning to sell 119 adult films for Rs 9 crore according to Mumbai Police Crime Branch.
&
Mumbai court grants bail to #RajKundra in the pornography case on a surety of Rs 50,000.#Shilpashetty #ShilpaShettyHusband #BoycottBollywood pic.twitter.com/GHmcSAwBXe— Amit Sen (@Ams_Blogger) September 21, 2021
यासह, न्यायालयाने असेही म्हटले आहे की, या प्रकरणातील त्याचे इतर सहकारी आरोपी आधीच जामिनावर सुटले आहेत. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असल्याने आरोपीला खटला संपेपर्यंत तुरुंगात ठेवता येणार नाही.
न्यायालयाच्या आदेशात असे म्हटले गेले आहे की, त्यांनी पूर्वी निरीक्षण केले होते की, खटल्याला वेळ लागेल आणि अशा परिस्थितीत आरोपींना कोठडीत ठेवणे योग्य होणार नाही. अशा वेळी जेव्हा तो त्याच्या उपस्थितीचा जामीन देण्यास तयार होता आणि न्यायालयाने लादलेल्या अटींचे पालन करण्यासही तयार होता. या सर्व बाबी लक्षात घेता न्यायालयाने राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांच्या जामिनाचे आदेश दिले.
राज कुंद्राला १९ जुलै रोजी अश्लील व्हिडिओ प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून ताब्यात घेण्यात आले होते. २ महिने तुरुंगात घालवल्यानंतर, बराच संघर्ष केल्यानंतर त्याला आता जामीन मिळाला आहे. पती राज कुंद्रा तुरुंगात गेल्यानंतर शिल्पा पूर्णपणे तुटली होती. तिने कामातून सुट्टीही घेतली होती आणि सोशल मीडियापासून काही काळ अंतरही ठेवले होते. यानंतर अभिनेत्रीने स्वतःला धैर्य दिले आणि तीही कामावर परतली. सध्या ती ‘सुपर डान्सर चॅप्टर ३’मध्ये परिक्षकाची भूमिका साकारताना दिसत आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कोणी म्हणतंय ‘रावणाचा ड्रेस’, तर कोणी ‘पक्षीराज’; विचित्र आउटफिटमुळे ट्रोल झाली उर्वशी
-राज कुंद्राच्या सुटकेनंतर गहना वशिष्ठने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘तू खूप…’










