बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. अक्षय कुमार नुकताच ‘बेल बॉटम’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटातील त्याची भूमिका अप्रतिम होती. तो आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करत असतो. त्याचबरोबर तो फिटनेसचा बाबतीतही सतत चर्चेत असतो. अनेकदा तो आपल्या सहकलाकारांबरोबर विनोद करतानाही दिसतो. अक्षयचा असाच एक कॉलेजमधील किस्सा आहे, ज्यामध्ये त्याच्या प्रेम पत्रामुळे कॉलेजमध्ये मोठा विनोद झाला होता.
अक्षयला चित्रपट विश्वातील ‘मिस्टर खिलाडी’ म्हटले जाते. त्याच्या ‘बेल बॉटम’ या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत नवा विक्रम केला आहे. ‘बेल बॉटम’ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ३० कोटींहून अधिक आणि परदेशी बॉक्स ऑफिसवर २० कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केले आहे. जर दोन्ही आकडे एकत्र केले, तर बेल बॉटमची एकूण कमाई ५० कोटींच्या पुढे गेली आहे. कोरोना विषाणूदरम्यान अक्षयने ‘बेल बॉटम’ शूट केले होते. चला जाणून घेऊ, काय आहे ती कथा जेव्हा खिलाडी नंबर वन अक्षय कुमारचा कॉलेजमध्ये प्रेम पत्रामुळे विनोद झाला होता.
अक्षय कुमार महाविद्यालयात असतानाचा हा काळ होता. त्यावेळी त्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला नव्हता. तो महाविद्यालयात शिकत होता. त्यावेळी अक्षय एका मुलीच्या प्रेमात पडला होता. आता अक्षयला त्या मुलीला इम्प्रेस करायचे होते. म्हणून त्याने त्याच्या एका मित्राची मदत घेतली.
अक्षय कुमारचे त्या मुलीवर एकतर्फी प्रेम होते आणि त्याला आपले प्रेम व्यक्त करायचे होते. अशा परिस्थितीत अक्षयकडे त्याच्या मित्राचा सल्ला ऐकण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्याच्या मित्राने त्याला सांगितले की, एक प्रेम पत्र लिहून त्या मुलीला दे. या प्रेम पत्रात आपल्या भावना व्यक्त कर, पण तो त्याच्या मित्राच्या सल्ल्यात अडकला आणि स्वतःच एक मजेशीर विनोद बनला.
अक्षय कुमारने त्याच्या मित्राला विचारले की, प्रेम पत्रात काय लिहावे? त्याला प्रेम पत्र कसे लिहावे हे माहिती नव्हते. अक्षयच्या मित्राने त्याला समजावून सांगितले की, प्रेम पत्रात काहीही नसते. यामध्ये बहुतेक लोक फिल्मी गाणी लिहितात. मित्राने अक्षयला काही गाणी ऐकण्याची आणि त्याच्या ओळी एका प्रेम पत्रात लिहिण्याचा सल्ला दिला. यानंतर, अक्षयने अनेक फिल्मी गाणी ऐकली आणि त्या प्रेम पत्रात त्याचे एक आवडते गाणे लिहिले.
यानंतर अक्षयने ते प्रेम पत्र ज्या मुलीवर प्रेम आहे, त्या मुलीला दिले. त्या मुलीने प्रेम पत्र वाचल्यानंतर तिला धक्का बसला. कारण अक्षय कुमारने ‘मासूम’ चित्रपटातील ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूं मैं’ हे गाणे त्या मुलीला लिहिलेल्या त्याच्या प्रेम पत्रात लिहिले होते. त्या मुलीने अक्षयचे हे प्रेम पत्र कॉलेजमधील प्रत्येकाला पाहायला दिले होते. ती मुलगी आणि इतर मुले अनेक दिवस अक्षयची त्या प्रेम पत्रासाठी खिल्ली उडवत राहिले. अशाप्रकारे, एका प्रेम पत्रामुळे इंडस्ट्रीचा अक्षयची खिल्ली उडवली गेली होती.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-करीना कपूरने केला परफेक्ट फॅमिली फोटो शेअर, समुद्र किनारी दिसले ‘सैफिना’चे कुटुंब
-कोणी म्हणतंय ‘रावणाचा ड्रेस’, तर कोणी ‘पक्षीराज’; विचित्र आउटफिटमुळे ट्रोल झाली उर्वशी










