बॉलिवूडचा ‘आखरी पास्ता’ म्हणून अभिनेते चंकी पांडे यांना ओळखले जाते. त्यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने नेहमी चाहत्यांचे मनोरंजन केले. आजही त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी ऍक्शनपासून कॉमेडीपर्यंत प्रत्येक पात्र साकारले आहे. त्यांना अनेक चित्रपटात काम करायची संधी मिळाली. मात्र त्यांना त्यांच्या कारकिर्दीतील पहिला चित्रपट हा एका अनोख्या पद्धतीने मिळाला. त्यांची ही स्टोरी इतर कलाकारांपेक्षा खूप वेगळी आहे. याच संदर्भात आज या लेखातून त्यांच्या या संघर्षांबद्दल जाणून घेऊया.
अभिनेता चंकी पांडे यांचा आज म्हणजे २६ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. यावर्षी चंकी पांडे त्यांचा ५९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक चित्रपटात सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले आहे. तर काही चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणूनही भूमिका साकारल्या. (chunky pandey got a break in bollywood due to the inability to tie knot of his pajamas read the full story)
चंकी पांडे यांना पायजमा कसा बांधायचा हे माहित नव्हते. यामुळे ते एका हॉटेलच्या टॉयलेटमध्ये उभे होते. याच दरम्यान ज्येष्ठ चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांची देखील त्याच हॉटेलमध्ये एंट्री झाली. इतकेच नव्हे, तर ते त्याच टॉयलेटमध्ये गेले. पहलाज यांनी चंकीला टॉयलेटमध्ये मदत केली आणि तिथूनच हे दोघे मित्र झाले. त्यानंतर चंकी पांडे यांना पहलाज यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. एकंदरीत एका पायजमाने त्यांना चित्रपट मिळवून दिला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. याचा उल्लेख चंकी पांडे यांनी प्रसिद्ध टीव्ही होस्ट ‘सायरस बरुचा’च्या शोमध्ये केला होता. चंकी म्हणाले होते की “मला एक समस्या होती, मला पायजामाची गाठ कशी बांधायची हे माहित होते. मात्र ती काढायची काही हे मला जमत नव्हते. मला खूप चांगलं आठवतंय की, मी त्या वेळी चुडीदार घालून लग्नाला गेलो होतो.”
ते पुढे म्हणाले की, “खूप जास्त बिअर प्यायल्यामुळे मला बाथरूममध्ये जावे लागले. परंतु आत गेल्यावर मला माझा नाडा उघडता आला नाही, तिथे मी बाथरूममध्ये उभा राहून मी ओरडायला सुरुवात केली की, कोणीतरी मला मदत करा.” माझ्या अशा वागण्याने अनेकांना वाटले की, मी चेष्टा करतोय. तेव्हा मात्र एक व्यक्ती पुढे आला. ज्याने मला मदत केली तो म्हणजे पहलाज निहलानी हा होता.”
या बाथरूममधील भेटीनंतर, दोघेही बसून कित्येक तास बोलत होते. कारण त्या काळात इंटरनेटची सुविधा नव्हती. या भेटीदरम्यान, पहलाज यांनी चंकी यांना त्यांच्या कामाबद्दल विचारले. तेव्हा चंकी म्हणाले की, “सध्या तरी मी एक मॉडेल आहे आणि चित्रपटांमध्ये स्वतःसाठी काम शोधत आहे.”
याच दरम्यान, पहलाज यांनी स्वतःची ओळख करून दिली. ते म्हणाले की, ते एक दिग्दर्शक आहेत आणि त्यांनी काही दिवसांपूर्वीच गोविंदासोबत एक चित्रपट बनवला आहे. हे ऐकल्यानंतर चंकी पांडे यांना आश्चर्य वाटले. या भेटीनंतर, चंकी यांना पहलाज निहलानी यांनी त्यांच्या कार्यालयात बोलावले. इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या चित्रपटात चंकी यांना काम दिले. चंकी यांनी पहिला चित्रपट साइन केला. पहलाज यांनी १९८७ साली ‘आग ही आग’ या चित्रपटामधून चंकी यांना रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्यास मदत केली. त्याचबरोबर १ वर्षानंतर त्यांनी चंकी यांना त्यांच्या ‘पाप की दुनिया’ या दुसऱ्या चित्रपटात संधी दिली.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-देव आनंद यांच्या रूपावर मरायच्या तरुणी, ‘यामुळे’ त्यांना सूट घालण्यावर शासनाने आणली होती बंदी
-अर्चना पूरन सिंग यांनी रात्री पळून जाऊन केलं होतं लग्न, बरंच चर्चेत राहिलंय त्यांचं वैयक्तिक आयुष्य