‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वातील पहिलाच विकेंडचा डाव रंगला आहे. या वर्षी विकेंडला चावडीचे रूप दिले आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील महेश मांजरेकर हा शो होस्ट करत असल्याने, सगळ्यानांच आनंद झाला आहे. पहिल्याच आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ड्रामा, ऍक्शन, मनोरंजन, भांडणे, इमोशन पाहायला मिळाले आहेत. तसेच घरात प्रत्येकाचे खरे चेहरे समोर येत आहेत. या विकेंडला मांजरेकरांनी सगळ्यांची शाळा घेतली आहे. ज्यांनी चांगले काम केले, त्यांचे त्यांनी कौतुक केले. तर ज्यांनी मनमानी केली त्यांना मात्र मांजरेकरांनी चांगलेच सुनावले आहे.
या आठवड्यात मीरा जग्गनाथ चांगलीच चर्चेत होती. घरात सर्वात जास्त तिचाच आवाज येत होता. खेळात असो, घरात किचनमध्ये असो, सगळीकडे ती तिचेच म्हणणे खरे करत होती. तिच्यासोबत गायत्री दातार देखील तिला पाठिंबा देत होती. विकेंडला मांजरेकरांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे. घरात शेफ टास्क होता. या टास्कमध्ये अक्षय वाघमारे आणि संतोष चौधरी हे सामील होते. यात अक्षय हा अत्यंत वाईट शेफ होता, तर संतोष हा घरी अचानक आलेला पाहुणा होता. यावेळी अक्षयने कोणत्याही पदार्थात काहीही मिसळून पदार्थ तयार केला होता आणि संतोष यांनी तो खाल्ला होता. तरी देखील मीराच्या मते दादूस या कार्याचे विजेते नव्हते. यावेळी महिलांनी वेळेत निर्णय न घेतल्याने, ‘बिग बॉस’ने हा टास्क रद्द केला होता.
या विकेंडला मांजरेकर मीराला म्हणाले की, “मीरा तुला असे का वाटले की, दादूस यांनी हा टास्क जिंकला नाही. काहीही बनवणं सोप्पं आहे का, काहीही खाणं सोप्पं आहे. मी एक दोन दिवसात घरात येतो आणि तुला तेच करून खायला देतो, मग बघुयात तू ते खाते का?” यावर मीरा तिचे मत मांडत असते. पण मांजरेकर म्हणतात की, “ऐकून घे, तू आधी समोरच्या माणसाचे ऐकून घ्यायला शिक.” यानंतर ते तिला घरात तिचाच आवाज खूप मोठा असतो, असे देखील सांगतात यासोबत ते गायत्रीला म्हणतात की, “मीराच्या मागे ती काय बोलली की, गुबुगुबु गुबुगुबु तू कधीतरी स्वतःचं मत मांडत जा.” यासोबत मांजरेकरांनी दादूस यांचे खूप कौतुक केले. त्यांनी अगदी हसते खेळते वातावरण ठेवून टास्क पूर्ण केला होता. (Bigg Boss Marathi 3 weekend, manjarskar scold on meera and appreciate dadus for task)
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-देव आनंद यांच्या रूपावर मरायच्या तरुणी, ‘यामुळे’ त्यांना सूट घालण्यावर शासनाने आणली होती बंदी
-अर्चना पूरन सिंग यांनी रात्री पळून जाऊन केलं होतं लग्न, बरंच चर्चेत राहिलंय त्यांचं वैयक्तिक आयुष्य