टोकियो ओलंपिकमध्ये नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकल्याने त्याचे मोठे कौतुक करण्यात आले. त्याच्या कामगिरीने सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. त्याने काबीज केलेल्या या यशामुळे मनोरंजन विश्वात देखील त्याचे कौतुक झाले. तसेच टीव्हीवरील अनेक शोमध्ये तो झळकू लागला. त्याला अनेक जाहिराती देखील मिळू लागल्या. अशात आता त्याने एका डान्सरला प्रपोज केले आहे. त्याच्या या प्रपोजचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ ‘डान्स +६’ या शोमधील आहे. यामध्ये नीरज शक्ती मोहनला प्रपोज करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये नीरजची दमदार एन्ट्री होते. सर्वजण त्याचे मोठे जंगी स्वागत करतात आणि सेटवर सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण होते. (Dance + 6: Neeraj Chopra proposes to Shakti Mohan, then Raghav said – ‘Thrown Javelin in the wrong place’)
‘डान्स +६’ या शोमध्ये राघव जुयाल आणि शक्तिमध्ये नेहमी रोमँटिक बातचीत होताना दिसते. राघव शक्तीला खुश करण्याची एकही संधी सोडत नाही. अशात नीरज या शोमध्ये पाहुणा म्हणून येतो. त्यानंतर राघव शक्तीला म्हणतो की, “मला तुझ्यावर प्रेम व्यक्त करत डान्स करायचा आहे.” दोघेही स्टेजवर दमदार डान्स करतात आणि स्पर्धक देखील खूप एन्जॉय करतात.
यामध्ये राघवला नीट प्रपोज करता येत नाही. त्यामुळे शक्ती नीरजला स्टेजवर येण्याची विनंती करते. तो स्टेजवर जातो आणि शक्तीला म्हणातो की, “माझ्या आयुष्यात सर्वात जास्त महत्व, तर भाल्याला आहे. मला चांगल जेवण बनवता येत नाही आणि माझ्याकडे त्याच्यासाठी फारसा वेळही नाही.” यावर राघव हार्ट ब्रेक झाल्याचे नाटक करत म्हणतो की, “भावा, तू चुकीचा भाला फेकला आहे.”
यानंतर नीरज, राघव आणि बाकीच्या स्पर्धकांबरोबर ‘इश्क तेरा तडपावे’ या गाण्यावर डान्स करतो. सर्व जण खूप मजा मस्ती करतात. सुपर परीक्षक रेमो डिसुझा देखील एक छान नृत्य सादर करतो. तसेच त्याला म्हणतो की, “एक सोन आहे ज्यापासून दागिने बनतात आणि तू असं सोन आहे ज्यापासून भारताचे रूप बदलले आहे.”
या व्हिडिओवर नेटकऱ्यानी खूप कमेंट्स केल्या आहेत. सर्वत्र नीरजच्या प्रपोजची चर्चा सुरू आहे. रसिक प्रेक्षकांना देखील नीरजचा असा प्रपोज खूप आवडला.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-विक्की कौशलच्या ‘सरदार उधम’ चित्रपटाचा टीझर रिलीझ, पाहायला मिळाला अभिनेत्याचा जबरदस्त लूक