हिना खान मनोरंजन जगातील एक अतिशय सुप्रसिद्ध सेलिब्रिटी आहे. ती अशा कलाकारांच्या यादीमध्ये येते, ज्यांनी आपल्या टॅलेंटच्या जोरावर स्वत:चे नाव कमावले आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टीव्ही मालिकेमुळे प्रसिद्ध झालेली ‘अक्षरा’ म्हणजेच हिना खानला प्रेक्षक खूप पसंत करतात. तिच्या अभिनयाचा आणि सौंदर्याचा प्रत्येकजण दिवाणा आहे.
अनेक इतर कलाकारांप्रमाणे हिनाला देखील तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात बरीच मेहनत घ्यावी लागली आहे. इतरांप्रमाणे तिच्याही आयुष्यात अनेक चढउतार आले आहेत. मात्र ती पुढे जातच राहिली. एक वेळ अशी होती, जेव्हा तिला काम मिळवण्यासाठी प्रोडक्शन हाऊसवर सतत फेऱ्या माराव्या लागायच्या. पण तेव्हा तिला तिच्या सावळ्या रंगामुळे ‘नॉट फिट’ करार देण्यात यायचा. अभिनेत्रीने अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला की, सुरुवातीला तिने कशाप्रकारे संघर्ष केला. ( actress hina khan reveals about her dark complexion)
हिना खान मूळची काश्मीरची आहे. त्यामुळे तिची काश्मिरी भाषेवर मजबूत पकड आहे. तिने आपल्या मुलाखतीत सांगितले की, शोमध्ये काश्मिरी मुलीचे पात्र होते. या काश्मिरी मुलीचे पात्र आपण साकारावे, अशी तिची इच्छा होती. पण यासाठी तिची निवड झाली नाही. जेव्हा हिनाला तिला मिळालेल्या नकाराचे कारण समजले, तेव्हा तिला आश्चर्य वाटले. तिला सांगण्यात आले की, “भलेही तू काश्मीरची आहेस, काश्मिरी भाषेची जाणकार आहेस. पण तुझा रंग सावळा आहे, त्यामुळे तू या भूमिकेसाठी योग्य नाही.” हिना खानने सांगितले की, त्या लोकांना बाकीचं काही घेणं देणं नव्हतं. त्यांना फक्त एक गोरी मुलगी हवी होती.
हिना खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर काही दिवसांपूर्वी अभिनेता अंगद बेदीसोबत तिचे एक गाणे रिलीझ करण्यात आले आहे. या गाण्याला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली. या गाण्याचे बोल आहेत ‘मैं भी बर्बाद’. या व्हिडिओ सॉंगमध्ये हिना नेहमीप्रमाणे खूपच सुंदर दिसत आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-विक्की कौशलच्या ‘सरदार उधम’ चित्रपटाचा टीझर रिलीझ, पाहायला मिळाला अभिनेत्याचा जबरदस्त लूक