Saturday, April 19, 2025
Home अन्य तरुणांना मागे टाकत ‘बिग बॉस’ जिंकली होती ‘ही’ मिश्यांमधील वृद्ध महिला, पाहून तुम्हीही व्हाल अचंबित

तरुणांना मागे टाकत ‘बिग बॉस’ जिंकली होती ‘ही’ मिश्यांमधील वृद्ध महिला, पाहून तुम्हीही व्हाल अचंबित

सप्टेंबर महिन्यात ‘बिग बॉस ओटीटी’ संपले. आता सर्वांना ‘बिग बॉस १५’ चे वेध लागले आहेत. अशात ‘बिग बॉस’च्या घरामध्ये अनेक नवीन चेहरे झळकणार अशी चर्चा सुरू आहे. अनेक मालिकांमधील तसेच मोठ्या पडद्यावर जादू केलेल्या अनेक कलाकारांची नावे देखील समोर येत आहेत. अशात ‘बिग बॉस’च्या माजी स्पर्धकांपैकी एका स्पर्धकाचा फोटो व्हायरल होत आहे. खाली दिलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक वृध्द त्यक्ती मोठ्या चष्म्यामध्ये दिसत आहे. पिकलेले केस आणि मिश्यांमध्ये दिसत असलेले हे वृध्द आजोबा एक महिला आहे आणि ती महिला बिग बॉसची विजेतीही आहे. थांबा थांबा लगेच तिला शोधायला जाऊ नका. तुमच्या मनातील सर्व शंका ही बातमी वाचूनच दूर होणार आहेत.

तर, मंडळी ही वृध्द महिला दुसरी तिसरी कोणी नसुन ‘बिग बॉस ओटीटी’ची विजेती दिव्या अग्रवाल आहे. काय झालात ना चकित! दिव्याच्या आगामी प्रोजेक्ट्साठी तिने हा लूक केला आहे.

दिव्याने हा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. तिची आगामी वेब सिरीज ‘कार्टेल’मध्ये ती या ऍस्थेटिक मेकअपमध्ये झळकणार आहे. या फोटोमध्ये तिने ऍस्थेटिक मेकअप केला असून, पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे. डोळ्यांवर मोठा चष्मा आणि मिश्यांवर हात ठेवत तिने हा फोटो पोस्ट केला आहे.

दिव्याने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “‘कार्टेल’ पाहिल्यानंतर अल्ट बालाजीच्या पूर्ण टीमला शुभेच्छा द्यायला मला वेळ नाही मिळाला. एकता कपूर यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे आभार मानते. माझा हा लूक माझ्यातील चित्रपटांसाठी असलेली धडपड आणि प्रेम दाखवतो. तुम्ही पहिल्या व्यक्ती आहात ज्यांनी माझ्याकडे एवढं लक्ष दिलं. मेकअप रुपमध्ये तासंतास बसून मी स्वतःला अशा पद्धतीने बदललं आहे. माझ्यावर कायम कृपादृष्टी ठेवण्यासाठी देवा तुझे खूप खूप आभार.”

‘स्प्लिट्सविला १०’ फेम आणि चित्रपट ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’ मध्ये स्वतःची मादक अदा दाखवणारी दिव्या अग्रवाल कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमी तिच्या चाहत्यांसाठी तिचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये देखील प्रेक्षकांनी तिच्यावर खूप प्रेम केले. तिचा धीट आणि बेधडक अंदाज इथे पाहायला मिळाला.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कपूर यांनी ‘कुरूप’ मुलगी म्हणून केला होता लता मंगेशकरांचा उल्लेख; पुढे विनंती करूनही ‘गानकोकिळे’ने…

-कॅटरिना ते प्रियंकापर्यंत ‘या’ अभिनेत्री होत्या चॉकलेट बॉयच्या प्रेमात; तर ऐश्वर्याची केली होती अभिनेत्याने फसवणूक

-विक्की कौशलच्या ‘सरदार उधम’ चित्रपटाचा टीझर रिलीझ, पाहायला मिळाला अभिनेत्याचा जबरदस्त लूक

हे देखील वाचा