दिवंगत अभिनेता इरफान खान बरोबर ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटामध्ये दमदार अभिनय साकारणारी अभिनेत्री राधिका मदान सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. अभिनयासह तिच्या बोल्ड आणि मादक फोटोंनी चाहत्यांची मने घायाळ करते. तिच्या वेगवेगळ्या लूकला चाहते खूप पसंत करतात. तसेच तिचे कौतुकही करतात. अशात तिच्या काही फोटोमुळे अभिनेत्रीला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला.
काही दिवसांपूर्वी राधिकाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो पोस्ट केले होते. या फोटोंवरुन तिला खूप ट्रोल केले गेले. तिने यामध्ये घातलेलेे कपडे नेटकऱ्यांना आवडले नाहीत. अनेकांनी तिला यावर खूप वाईट वाईट कमेंट्स देखील केल्या. या सर्वांना तिने आता खडेबोल सुनावले आहेत. (Radhika Madan narrate to the trollers , said- ‘I have a body, I wear what I like’)
राधिकाने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये टीका करणाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली. ती म्हणाली की, “मी माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले होते. त्यावर आलेल्या सर्व कमेंट मी वाचल्या. अनेकांनी माझ्यावर जहरी टीका केली. मी त्यांना सांगू इच्छिते की, हे माझे शरीर आहे. मला जे छान आणि सोईस्कर वाटेल तेच मी घालणार. माझ्या शरीरावर आणि कपड्यांवर बाकीच्यांना बोलण्याचा काहीच अधिकार नाही.”
अभिनेत्रीने यामध्ये काळी ब्रालेट आणि हाय वेस्टेड स्ल्याक्स घातले होते. यामध्ये ती खूप बोल्ड दिसत होती. त्यामुळे तिच्यावर टीका करण्यात आली होती.
तिच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाले, तर राधिकाने एकोणीसाव्या वयात ‘मेरी आशिकी तुमसे ही’ या मालिकेमधून अभिनयाला सुरुवात केली. ‘झलक दिखला जा’मध्ये देखील तिने स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. ‘पटाखा’ या चित्रपटामधून ती बॉलिवूडमध्ये आली. खूप कमी वयातच तिने अभिनयात आपला हातखंडा केला आहे.
नुकतेच विक्की कौशलचा भाऊ सनी कौशल बरोबर राधिका चित्रपट ‘शिद्दत’ मध्ये झळकली. कुणाल देशमुखने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राधिका आणि सनी नुकतेच डान्सिंग रियॅलिटी शो ‘डान्स दीवाने’ मध्ये गेले होते. यावेळी दोघांनी माधुरी दीक्षित बरोबर डान्स देखील केला.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-विक्की कौशलच्या ‘सरदार उधम’ चित्रपटाचा टीझर रिलीझ, पाहायला मिळाला अभिनेत्याचा जबरदस्त लूक