महान क्रांतिकारक आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी वयाच्या २३ व्या वर्षी फाशी देण्यात आलेल्या भगतसिंग यांची जयंती आज देशभरात साजरी केली जात आहे. भगतसिंग यांची जयंती २७ आणि २८ सप्टेंबर या दोन दिवशी साजरी केली जाते. ते हे एक महान क्रांतिकारक होते, ज्यांनी भारताचे स्वातंत्र्य मिळवण्यात महत्वाची भूमिका बजावली आणि ब्रिटिशांचा खंबीरपणे सामना केला.
भगतसिंग यांनी आपल्या विचाराने आणि हेतूने ब्रिटिश राजवट हादरवून टाकली होती आणि तरुणांमध्ये क्रांतीची लाट भरली होती. या स्वातंत्र्य सेनानीची ही देशभक्ती आणि उत्कटता दर्शवणारे अनेक चित्रपट बॉलिवूडमध्ये बनले आहेत. या चित्रपटांमध्ये अनेक अभिनेत्यांनी त्यांचे पात्र उत्तमरीत्या साकारले आहे. भगत सिंग यांच्या जयंतीनिमित्त, आपण त्या अभिनेत्यांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी पडद्यावर भगत सिंग यांची ओळख करून दिली.
जयराज
‘शहीद-ए-आझम भगतसिंग’ चित्रपटात १९५४ मध्ये अभिनेता जयराज क्रांतिकारक भगतसिंगच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन जगदीश गौतम यांनी केले होते. चित्रपटात जयराज व्यतिरिक्त स्मृती बिस्वास, आशिता मजुमदार मुख्य भूमिकेत होते.

शम्मी कपूर
प्रसिद्ध अभिनेता शम्मी कपूर यांनी ‘शहीद भगत सिंग’ चित्रपटात १९६३ मध्ये भगतसिंग यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात शम्मी कपूरसोबत अभिनेता प्रेमनाथ, उल्हास आणि अचला सचदेव मुख्य भूमिकेत होते. याचे दिग्दर्शन के एन बन्सल यांनी केले होते.

मनोज कुमार
भारत कुमार म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते मनोज कुमार यांनी आपल्या चित्रपट प्रवासात अनेक देशभक्तीपर चित्रपटांमध्ये काम केले आहे. या अनुक्रमात १९६४ साली त्यांनी ‘शहीद’ चित्रपटात भगतसिंग यांची मुख्य भूमिका साकारली.

सोनू सूद
अभिनेता सोनू सूदही भगतसिंगच्या भूमिकेत पडद्यावर दिसला आहे. २००२ च्या ‘शहीद-ए-आझम’ चित्रपटात सोनू सूदने शहीद भगतसिंग यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार नायर यांनी केले होते.

अजय देवगण
अजय देवगण ‘द लीजेंड ऑफ भगतसिंग’ चित्रपटात भगतसिंग यांच्या भूमिकेत दिसला आहे. हा चित्रपट २००२ मध्ये आला. त्या वर्षी भगतसिंग यांच्यावर तीन चित्रपट प्रदर्शित झाले. पण प्रेक्षकांना अजय देवगणचे पात्र प्रचंड आवडले होते. त्यासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बॉबी देओल
बॉबी देओल २००२ मध्ये भगतसिंग यांची भूमिका साकारत मोठ्या पडद्यावर दिसला. त्याच्या चित्रपटाचे नाव होते ‘२३ मार्च १९३१: शहीद ‘ बॉबी देओल व्यतिरिक्त त्याचा भाऊ सनी देओलने चित्रपटात आझाद चंद्रशेखरची भूमिका साकारली होती.

सिद्धार्थ
आमिर खान २००६ च्या ‘रंग दे बसंती’ चित्रपटात चंद्रशेखर आझादच्या भूमिकेत दिसला. तर भगत सिंग यांची व्यक्तिरेखा सिद्धार्थने साकारली होती. हा चित्रपट त्या वर्षीचा मोठा हिट ठरला.

देशासाठी बलिदान देणाऱ्या भगतसिंग यांचे बलिदान कधीही विसरता येणार नाही. बॉलिवूडमध्ये देशभक्ती आणि ब्रिटिशांना पराभूत करणारी त्यांची आवड दाखवून अनेक चित्रपट बनवले गेले. त्यांचे पात्र आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित आठवणी मोठ्या पडद्यावर जवळून चित्रित केल्या गेल्या. या सर्व चित्रपटांमध्ये अनेक अभिनेत्यांनी त्यांचे पात्र उत्तम प्रकारे साकारले.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-विक्की कौशलच्या ‘सरदार उधम’ चित्रपटाचा टीझर रिलीझ, पाहायला मिळाला अभिनेत्याचा जबरदस्त लूक










