Wednesday, August 6, 2025
Home बॉलीवूड पंतप्रधान मोदींपासून ते बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांनी दिल्या लता दीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

पंतप्रधान मोदींपासून ते बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांनी दिल्या लता दीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

संगीताच्या दुनियेत बॉलिवूडची गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता दीदींचे नाव आजही आग्रहाने घेतले जाते. त्यांनी ७० च्या दशकात आपल्या सुरांनी संपूर्ण बॉलिवूड मंत्रमुग्ध केले. लता दीदी २८ सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस साजरा करतात. त्यांच्या वाढदवसानिमित्त त्यांना फक्त संगीत आणि सिनेसृष्टीमधूनच नाही, तर राजकीय नेत्यांकडून देखील शुभेच्छा येत आहेत. मंगळवारी त्या ९२ वर्षांच्या झाल्या. त्यांचे सर्व चाहते त्यांच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करत आहेत. त्यातीलच काही व्यक्तींच्या शुभेच्छा जाणून घेऊयात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लता दीदींना ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिले आहे की, “लता दीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांचा सुरेल आवाज पूर्ण जगात गुंजतो. भारतीय संस्कृतीसाठी त्यांच्या विनम्रता आणि जिद्दीचा सन्मान केला जातो. खरोखरच त्यांचा आशीर्वाद शक्तीचे एक स्त्रोत आहे. मी त्यांच्या निरोगी आणि दीर्घ आयुष्याची प्रार्थना करतो.” (From Prime Minister Narendra Modi to Bollywood celebs, these celebrities wish Lata Mangeshkar a happy birthday)

जूही चावला
अभिनेत्री जूही चावलाने देखील लता दीदींना शुभेच्छा दिल्या आहेत. तिने लता दीदींबरोबर एक फोटो शेअर केला आहे आणि लिहिले आहे की, “लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त मी १०० झाडे लावणार आहे. घरी रेडिओवर तुमचे ७० च्या दशकातील गाणे ऐकले. गाणं ऐकून असं वाटलं फुलांचा पाऊस पडत आहे आणि गंगा माई वाहत आहे.”

मधुर भंडारकर
चित्रपट निर्माते मधुर भंडारकर यांनी देखील ट्वीट करत लता दीदींना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्वीट करत लिहिले आहे की, “वाढदिवसाच्या शभेच्छा लता दीदी. ज्यांचा आवाज सर्वांच्याच मनाला स्पर्श करतो. आजवर माझा असा एकही दिवस गेला नाही, ज्या दिवशी मी लता दीदींचे गाणे ऐकले नाही. गणपती बाप्पा तुम्हाला दीर्घ आणि सुदृढ आयुष्य देवो.” तसेच त्यांनी हॅशटॅगमध्ये लिहिले की, ‘सुरांची देवी’

धर्मेंद्र
दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी देखील ट्वीटमध्ये लता दीदींबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच लिहिले आहे की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा लता जी. दुनियेत सर्वात जास्त पसंती असलेली गायिका लता जी. तुमची कृपादृष्टी कायम आमच्यावर असूद्या आणि तुम्ही कायम खुश रहा.”

https://twitter.com/aapkadharam/status/1442717921839435782?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1442717921839435782%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9hindi.com%2Fentertainment%2Fbollywood-news%2Flata-mangeshkar-birthday-pm-narendra-modi-and-other-celebs-wish-singer-on-her-birthday-844205.html

लता दीदींवर चहू बाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांना साल १९६९ मध्ये ‘पद्मभूषण’, साल १९८९ मध्ये ‘दादासाहेब फाळके’, साल १९९९ मध्ये ‘पद्मविभूषण’, साल २००१ मध्ये ‘भारतरत्न’ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

तसेच साल १९८२ मध्ये ‘परिचय’, साल १९७४ मध्ये ‘कोरा-कागज’के आणि साल १९९० मध्ये ‘लेकिन’ या चित्रपटांसाठी म्हणजे एकूण तीन वेळा प्लेबॅक गायिका नॅशनल पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कपूर यांनी ‘कुरूप’ मुलगी म्हणून केला होता लता मंगेशकरांचा उल्लेख; पुढे विनंती करूनही ‘गानकोकिळे’ने…

-कॅटरिना ते प्रियंकापर्यंत ‘या’ अभिनेत्री होत्या चॉकलेट बॉयच्या प्रेमात; तर ऐश्वर्याची केली होती अभिनेत्याने फसवणूक

-विक्की कौशलच्या ‘सरदार उधम’ चित्रपटाचा टीझर रिलीझ, पाहायला मिळाला अभिनेत्याचा जबरदस्त लूक

हे देखील वाचा