अभिनेता रणबीर कपूर मंगळवारी (२८ सप्टेंबर) त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने आपल्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. बॉलिवूडच्या सर्वात चर्चित कुटुंबातील म्हणजेच कपूर कुटुंबातील तो चौथ्या पिढीचा सदस्य आहे. त्याच्या अभिनयामुळे आणि सुंदरतेमुळे तो बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखला जातो. या ‘चॉकलेट बॉय’ रणबीरचे आजवर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींबरोबर नाव जोडले गेले आहे.
परंतु त्या अभिनेत्री कोणत्या आहेत? असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला तर जाणून घेऊया त्या अभिनेत्रींबाबत… (Birthday: Ranbir Kapoor’s name has been associated with these actresses, now going to take seven rounds with Alia)
दीपिका पदुकोण
बॉलिवूडमध्ये एकेकाळी चर्चित जोड्यांमध्ये रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण ही जोडी देखील होती. या दोघांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते, पण नंतर रणबीर अभिनेत्रीला फसवत असल्याचे समोर आले. त्यानंतर या दोघांचे नाते फार काळ टिकले नाही. तसेच दीपिकाने रणवीर सिंगबरोबर लग्न केले.
कॅटरिना कैफ
कॅटरिना कैफ देखील चॉकलेट बॉयच्या प्रेमात पडली होती. ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या चित्रपटामध्ये या दोघांची प्रेम कहाणी पाहायला मिळाली. चित्रपटाच्या शूटिंगनंतर हे दोघे खरोखर एकमेकांच्या प्रेमात आहेत, अशा बातम्या येऊ लागल्या होत्या. नंतर एका तिसऱ्या व्यक्तीमुळे या जोडीमध्ये फूट पडली असे म्हटले जाते.
अवंतिका मलिक
चित्रपटांमध्ये येण्या आधीच रणबीर खूप रंगील स्वभावाचा होता. त्यावेळी तो अवंतिका मलिकच्या प्रेमात पडला होता, तेव्हा प्रेमाबद्दल त्याला फारशी समज नव्हती. या दोघांचे नाते देखील फार काळ टिकले नाही. काही काळानंतर अवंतिकाने इम्रान खानबरोबर लग्न केले.
अमिषा पटेल
अभिनेत्री अमिषा देखील रणबीरच्या प्रेमात होती. खरं तर, कॅटरिनाबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर ‘चॉकलेट बॉय’ अमिषाबरोबर जवळीक साधताना दिसत होता. परंतु या दोघांचे नाते देखील फार काळ टिकले नाही.
नर्गिस फाखरी
‘रॉकस्टार’ चित्रपटानंतर रणबीर नर्गिस फाखरीला डेट करताना दिसला होता. चित्रपटामध्ये या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले. अनेक वृत्तांमध्ये रणबीर आणि कॅटरिनाच्या ब्रेकअपसाठी नर्गिसला देखील जबाबदार ठरवले गेले होते.
प्रियांका चोप्रा
चित्रपट ‘अंजना अंजानी’मध्ये रणबीर कपूर आणि प्रियांका चोप्रा या दोघांनी एकत्र काम केले होते. रणबीर आणि प्रियांकाची जोडी यावेळी खूप चर्चेत होती. बराच काळ हे दोघे एक चांगले जोडपे म्हणून एकत्र राहिले. परंतु काळानुसार त्यांच्यामध्ये देखील फूट पडली.
सोनम कपूर
अभिनेत्री सोनम कपूरबरोबर देखील रणबीर कपूरचे नाव जोडले गेले आहे. रणबीरने दीपिकासाठी सोनमला फसवल्याचे, असे अनेक वृत्तांमध्ये सांगण्यात आले होते.
आलिया भट्ट
सध्या रणबीर कपूर आलिया भट्टला डेट करत आहे. हे दोघे रविवारी (२६ सप्टेंबर) जोधपूरला गेले आहेत. दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे देखील म्हटले जात आहे.
लग्नाच्या तयारीसाठी आणि रणबीरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते जोधपूरला गेले असल्याचे सांगितले जात आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-