कोणत्याही नवीन सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला की, प्रेक्षकांना पुढची उत्सुकता असते ती, सिनेमातील गाण्यांची. त्यामुळे सिनेमातील पहिले गाणे कधी प्रदर्शित होते याकडे सर्वांचेच लक्ष लागून असते. तसेही आपल्या भारतीय चित्रपटांमध्ये संगीत आणि गाण्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक सिनेमातील कमिटीत कमी एक गाणे तरी ब्लॉकबस्टर ठरतेच ठरते. त्यामुळेच गाणे संगीत हा सिनेमाचा श्वास आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
लवकरच अभिनेत्री तापसी पन्नूचा ‘रश्मि रॉकेट’ हा सिनेमा झी 5 वर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील पहिले गाणे ‘घनी कूल छोरी’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे एक गरबा सॉन्ग असून, यावर्षीचा नवरात्रीचा उत्साह नक्कीच वाढवणारे आहे. या गाण्यात तापसीचा अतिशय पारंपरिक थोडा वेस्टर्न टच असलेल्या गुजराती लूक पाहायला मिळत आहे.
या गाण्यात तिने एक काळया रंगाचा लेहेंगा घातला असून, पायात मोजडी घातली आहे. या गाण्याला आणि गाण्याच्या संगीताला आजच्या काळानुसार तयार करण्यात आले असून, गाण्यात तापसीचा धमाकेदार डान्स पाहायला मिळत आहे. कुरळे केस, पारंपरिक लेहेंगा, सामान्य मेकअप, मोजडी या लूकमध्ये तापसी एकदम गुजराती छोरी दिसत आहे.
तापसी पन्नूच्या ‘रश्मि रॉकेट’ या सिनेमात रश्मीची गोष्ट पाहायला मिळणार आहे. या रश्मीच्या आयुष्यात एक असे वळण येते जेव्हा तिचे जेंडर व्हेरिफिकेशन टेस्टसाठी बोलवले जाते, तेव्हा ती कोलमडते, आणि स्वतःला बरोबर सिद्ध करण्यासाठी, न्याय मिळवण्यासाठी लढाई सुरु करते. या सिनेमात तापसीसोबत सुप्रिया पाठक, अभिषेक बनर्जी, प्रियांशु पेन्युली, सुप्रिया पिळगावकर आदी कलाकार दिसणार आहे. आकर्ष खुराना यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा रोनी स्क्रूवाला, नेहा आनंद, प्रांजल खंडड़िया यांची निर्मिती आहे. १५ ऑक्टोबरपासून हा चित्रात सर्वांना पाहता येणार आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-विक्की कौशलच्या ‘सरदार उधम’ चित्रपटाचा टीझर रिलीझ, पाहायला मिळाला अभिनेत्याचा जबरदस्त लूक