बॉलिवूडमधील कायम वादाच्या भोवऱ्यात आणि ट्रोलर्सच्या रडारवर असलेली अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा एकदा वादाच्या विळख्यात सापडली आहे. यावेळी तिने केलेल्या कृत्यावरून तिला खूप ट्रोल केले जात आहे. तसेच नेटकरी तिच्यावर टीका करत वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.
अभिनेत्री मंगळवारी (२७ सप्टेंबर) मुंबई विमातळावर दिसली होती. तिथे गाडीमधून उतरताच तिला फोटोग्राफर्सनी घेरले. आपल्या चाहत्यांसाठी तिने तिथे छान छान पोझही दिल्या. जाताना ती खूप आनंदात देखील होती. तिने यावेळी पूर्ण पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता. यावेळी ती मस्त काळा गॉगल लावत कॅमेऱ्या समोर पोझ देत होती. सर्व काही ठीक होते, पण कंगनाने कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले होते. तिने ‘नो एन्ट्री नो मास्क’ झोनमध्ये प्रवेश केला होता.
तिचे यावेळचे फोटो फोटोग्राफर व्हायरल भयानीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. नेटकऱ्यांचे यावर लक्ष जाताच त्यांनी कंगनाला खडेबोल सुनवायला सुरुवात केली. अनेकांनी तिच्यावर कमेंट केल्या. यामध्ये एकाने लिहिले की, “मॅडम तुमचं मास्क कुठे आहे?” दुसऱ्या एकाने तिला टोमणा मारत लिहिले की, “कुठे आहेत ते लोक जे नियम पाळण्याची भाषा करतात.” आणखी एकाने तेथील व्यवस्थेला दोष देत लिहिले की, “ती बिना मास्क गेली पण सुरक्षा रक्षकांचे तिच्याकडे लक्ष नाही आणि तिला कोणी आडवले पण नाही.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “कंगना काही महाराणी आहे का? ती मास्क का नाही लावत.”
काही दिवसांपूर्वीच तिला कोरोनाची लागण झाली होती. ती त्यातून लवकरच बरी देखील झाली. कोरोना झाल्यावर काय होते हे माहीत असून सुद्धा तिने मास्क घालण्याकडे दुर्लक्ष केले.
दुसरीकडे, नुकताच तिचा ‘थलायवी’ चित्रपट प्रदर्शित झाला. तामिळनाडूच्या सलग सहा वर्षे निवडून आलेल्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–बॉलिवूडचे ‘हे’ मोठे सिनेमे ठरले नुसताच फुसका बार, कमाईतून बजेट वसूल करणे देखील झाले मुश्किल
–बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी लग्नानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटांच्या करिअरला ठोकला रामराम










