Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड काय सांगता! पुढच्या वर्षी ईदला सलमानचा नव्हे, तर ‘हा’ मल्टीस्टारर चित्रपट येणार रसिकांच्या भेटीला

काय सांगता! पुढच्या वर्षी ईदला सलमानचा नव्हे, तर ‘हा’ मल्टीस्टारर चित्रपट येणार रसिकांच्या भेटीला

कोरोना महामारीमुळे २०२० मध्ये बंद झालेली चित्रपटगृहे आता उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने २२ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व चित्रपटगृहे उघडण्याची परवानगी दिली आहे. या परवानगीनंतर, चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा समोर येऊ लागल्या आहेत. अशा परिस्थितीत आता ‘एक विलन रिटर्न्स’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही समोर आली आहे. अलीकडेच, चित्रपटाची अभिनेत्री दिशा पटानीने या चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करताना सांगितले आहे की, हा चित्रपट पुढच्या वर्षी ८ जुलै २०२२ रोजी प्रदर्शित होईल. आता हा चित्रपट पुढच्या वर्षी ईदला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सहसा ईदचा सण सलमान खानशी जोडला जातो, पण यावेळी ईदच्या दिवशी ‘एक विलन रिटर्न्स’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटाच्या मागील भागामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि श्रद्धा कपूर दिसले होते. आता ‘एक विलन रिटर्न्स’मध्ये एक मोठी स्टारकास्ट दिसणार आहे. ज्यात अर्जुन कपूर, दिशा पटानी यांचा समावेश आहे. निर्मात्यांनी या चित्रपटासाठी २०२२ ची ईद बुक केली आहे. ‘एक विलन’चा प्रीक्वल २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होते. तर रितेश देशमुखने पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारली होती आणि त्याचे पात्र खूप लोकप्रिय झाले होते. चित्रपटाचे संगीतही खूप लोकप्रिय झाले.

या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार आहेत, तर या चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित सूरी आहेत. मोहित यांनी अलीकडेच माध्यमांना सांगितले होते की, “एक विलन रिटर्न्सच्या शूटिंगबद्दल मी खूप उत्साहित आहे, जरी या चित्रपटाचे शूटिंग कोरोना विषाणूमुळे लांबले असेल, परंतु आता आम्ही या चित्रपटाच्या शूटिंगवर परतलो आहोत. पुन्हा शूटिंगवर परतल्याबद्दल मी खूप आनंदी आहे.”

‘एक विलन रिटर्न्स’ची घोषणा आदित्य रॉय कपूरसोबत झाली होती. आदित्यने मोहितसोबत ‘आशिकी २’ सारखा यशस्वी चित्रपट केला. मात्र, क्रिएटिव डिफरेंसेजमुळे आदित्यने चित्रपट सोडला आणि अर्जुन कपूरने प्रवेश केला. डिझ्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या ‘भूत पोलिस’मध्ये अर्जुन दिसला होता. अर्जुनचा थिएटरमध्ये  ‘संदीप और पिंकी फरार है’ हा चित्रपट या वर्षी कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेपूर्वी प्रदर्शित झाला होता. परंतु हा चित्रपट फ्लॉप ठरला. मात्र, नंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या वर्षी अर्जुनचा आणखी एक चित्रपट ‘सरदार का नातू’ नेटफ्लिक्सवर आला.

त्याचवेळी, जॉन अब्राहमचा शेवटचा प्रदर्शित झालेला चित्रपट ‘मुंबई सागा’ आहे. अलीकडेच जॉनने त्याचा दुसरा चित्रपट ‘सत्यमेव जयते २’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे, जी २६ नोव्हेंबर आहे. २०२१ मध्ये जॉनचा हा दुसरा चित्रपट आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

बॉलिवूडचे ‘हे’ मोठे सिनेमे ठरले नुसताच फुसका बार, कमाईतून बजेट वसूल करणे देखील झाले मुश्किल

बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी लग्नानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटांच्या करिअरला ठोकला रामराम

प्रायव्हेट जेटमध्ये मांडी घालून बसलेल्या प्रियांका चोप्राचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले, ‘खरी देसी गर्ल’

हे देखील वाचा