बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे रणवीर सिंग. रणवीरने स्वबळावर या क्षेत्रात आपली जागा निर्माण केली आहे. तो वेगवेगळ्या कारणासाठी सतत चर्चेत असतो. त्याच्या अभिनयाबरोबरच तो अतरंगी पेहरावासाठी आणि त्याच्या एअरपोर्ट लूक्ससाठी ओळखला जातो. तो त्याच्या लूक्ससोबत वेगवेगळे प्रयोग करत असतो. रणवीरची अमेरिकेच्या नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमध्ये भारतासाठी ब्रँड एम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
रणवीर नेहमी आपल्या कारकिर्दीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतो. तो सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. २०२१-२२ मधील ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त भारतात नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या लीग प्रोफाइलला प्रोत्साहन देण्याचं काम रणवीर करणार आहे. यावर बोलताना रणवीर म्हणाला की, “बास्केटबॉल आणि एनबीए मला लहानपणापासूनच खूप आवडते. मी नेहमी या संस्कृतीतील म्युझिक, फॅशन आणि मनोरंजनावर प्रभावित होतो.”
एनबीएचे कमिश्नर आणि COO Mark Tatum म्हणाले की, “रणवीर सिंग हा बॉलिवूडचा आयकाॅन आहे आणि या पिढीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेता आहे. तो एनबीएचा चाहता आहे जो खेळाडूंबद्दल पॅशनेट आहे. आम्ही रणवीर सोबत काम करण्यास उत्सुक आहोत.” तसेच रणवीर एनबीएच्या अनेक लीग कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे. हे कार्यक्रम एनबीएच्या वैयक्तिक सोशल मीडिया अकाऊंटवरून दाखवले जातील. रणवीर क्लिव्हलॅडमध्ये होणार्या एनबीए ऑल-स्टार २०२२ मध्ये सहभागी होणार आहे.
दरम्यान, रणवीरला त्यांच्या स्टाइल कंटेंटवर देखील दाखवले जाणार आहे. काही कंटेंट सोशल मीडियावर शेअर करेल आणि खेळाडूंना देखील भेटेल. रणवीर एनबीए स्टाईलमध्ये दिसणार आहे. हे भारतीय फॅन फॉलोविंगसाठी एक न्यू लाइफस्टाइल बेस्ट इंस्टाग्राम अकाउंट असेल. या अकाउंटवर एनबीए आणि त्यांची फॅशन दाखवली जाणार आहे.
रणवीरविषयी बोलायच झाले, तर तर तो लवकर ‘जयेश भाई जोरदार’ आणि ‘सर्कस’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे . तसेच करण जोहरच्या आगामी चित्रपटामध्ये रणवीर आलियासोबत रोमांस करताना दिसेल .
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–‘असं रूप आणि शृंगार असल्यास कोणासही येड लागेल’, म्हणत चाहत्यांनी केले अक्षयाच्या सौंदर्याचे कौतुक