मनोरंजन विश्वातून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. कन्नड टेलिव्हिजन अभिनेत्री सौजन्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, अभिनेत्रीने बेंगळुरूच्या कुंबलगोडू येथील तिच्या अपार्टमेंटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. प्राथमिक तपासात समोर आले आहे की, अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या खोलीत लटकलेला आढळला. तिच्या पायाला टॅटूचे चिन्ह असल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, पोलीस तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून तिच्या आत्महत्येमागील कारण कळू शकेल. पोलीस तिच्या कुटुंबीयांची आणि सहकाऱ्यांची चौकशी करत आहेत. पोलिसांनी एक सुसाईड नोट जप्त केली आहे. सुसाईड नोटमध्ये असे लिहिले आहे की, अभिनेत्री या यासाठी इतर कोणालाही जबाबदार धरत नाही आणि त्यासाठी ती स्वतः च जबाबदार आहे. तिने त्यात आपल्या पालकांची माफीही मागितली आहे. सुसाईड नोटमध्ये असेही लिहिले आहे की, तिला आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या नाही. परंतु तिने आयुष्यात ज्या गोष्टींना सामोरे जावे लागले, त्यामुळे ती मानसिकरीत्या अस्वस्थ होती. तिने तिला मदत करणाऱ्या सर्व लोकांचे आभार मानले आहेत.
RIP ????#RIPSoujanya #Soujanya #kannada #tvactress #sandalwood #rvcjmovies pic.twitter.com/O3XAJvwDqz
— RVCJ Movies (@rvcjmovies) September 30, 2021
तीन पानांच्या सुसाईड नोटमध्ये २७, २८ आणि ३० सप्टेंबरच्या तारखा आहेत. पोलिसांचा असा विश्वास आहे की, तीन दिवसांपूर्वी सौजन्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या निधनाच्या माहितीने चाहते आणि कन्नड टीव्ही जगताचे जवळचे सर्व लोक हैराण झाले आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सुरू असलेल्या समस्यांमुळे सौजन्या अस्वस्थ होती. सौजन्याने अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले होते.
यापूर्वीही कन्नड अभिनेत्रीने आत्महत्या केली होती
सौजन्या कन्नड टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने टीव्ही तसेच दक्षिण चित्रपटांमध्ये काम केले आहे. ही बातमी कन्नड इंडस्ट्रीसाठी धक्कादायक आहे. काही दिवसांपूर्वी आणखी एक प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री जयश्री रमैया हिनेही आत्महत्या केली होती.
मानसिक आरोग्यामुळे उचलले टोकाचे पाऊल
जयश्री रमैयाने मानसिक आरोग्य आणि संघर्षामुळे आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले होते. वर्षाच्या सुरुवातीला ‘बिग बॉस कन्नड’ फेम अभिनेत्री चैत्र कुटूर हिनेही आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘या’ कलाकारांनी बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी निर्मात्यांकडून घेतले होते बक्कळ पैसे
-किर्तनकार शिवलीला पाटील बिग बाॅस मराठीच्या घराबाहेर? पाहा काय आहे नक्की प्रकरण
-पर्सच्या निमित्ताने पुन्हा रंगला अनुपम खेर आणि त्यांच्या आईमध्ये मजेशीर संवाद










