बॉलिवूडचा किंग खान याचे जगभरात लाखो चाहते आहेत. त्याचे हे चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी अक्षरश: वेडे असतात. अशामध्ये २०१८ पासून शाहरुख खानचा एकही चित्रपट रिलीझ झाला नाही. पण तो पुढच्या वर्षी बॉक्स ऑफिसवर जोरदार धमाका करणार आहे. कदाचित पुढील वर्षी प्रेक्षकांना त्याचे एक नव्हे, तर दोन चित्रपट पाहायला मिळू शकतात. या चित्रपटांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र अभिनेता सिद्धार्थ आनंदच्या ‘पठाण’ या चित्रपटाशिवाय अटलीच्या चित्रपटामध्येही काम करत आहे.
एटलीच्या या चित्रपटात दाक्षिणात्य सिनेमातील कलाकार प्रियामणी आणि नयनतारा शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसतील. माध्यमातील वृत्तानुसार, शाहरुख खान अटलीच्या पुढच्या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारणार आहे. म्हणजेच या चित्रपटात एक नाही, तर दोन शाहरुख खान असतील. तसे पाहायला गेले, तर चित्रपटाची कथा भारतीय अंदाजातील ‘मनी हाईस्ट’ प्रमाणे तयार केली गेली आहे. एक थ्रिलर, ज्यामध्ये शाहरुख मुलींच्या गटाचे नेतृत्व करणाऱ्या प्राध्यापकाच्या भूमिकेत आहे. शाहरुख या चित्रपटात पिता -पुत्र दोघांच्याही भूमिकेत दिसणार आहे. यात एक तरुण शाहरुख वृद्धावस्थेतील शाहरुखसोबत दिसणार आहे. (shahrukh khan to play double role once again know the complete details related to the particular film)
शाहरुख खानचे चाहते त्याच्या चित्रपटांच्या रिलीझची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकत्याच आलेल्या या बातमीने प्रेक्षकांच्या उत्साहात भर घातली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. सध्या या चित्रपटाचे शूटिंग मुंबईत सुरू आहे. यापूर्वी पुण्यात शूटिंग पार पडले आहे. महत्त्वाचे म्हणजे, सध्या चित्रपटाशी संबंधित प्रत्येक गोष्ट गुप्त ठेवली जात आहे.
शिवाय शाहरुख खान शेवटचा ‘झीरो’ चित्रपटात दिसला होता, ज्यामध्ये तो कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा त्याच्यासोबत मुख्य भुमिकेत होत्या. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘या’ कलाकारांनी बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी निर्मात्यांकडून घेतले होते बक्कळ पैसे
-किर्तनकार शिवलीला पाटील बिग बाॅस मराठीच्या घराबाहेर? पाहा काय आहे नक्की प्रकरण
-पर्सच्या निमित्ताने पुन्हा रंगला अनुपम खेर आणि त्यांच्या आईमध्ये मजेशीर संवाद