Friday, January 16, 2026
Home मराठी लग्नाला दहा महिने पूर्ण झाल्याने, सई लोकूर मालदीवमध्ये पतीसोबत करतेय एन्जॉय, बिकिनी फोटो व्हायरल

लग्नाला दहा महिने पूर्ण झाल्याने, सई लोकूर मालदीवमध्ये पतीसोबत करतेय एन्जॉय, बिकिनी फोटो व्हायरल

या वर्षी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री लग्न बंधनात अडकल्या आहेत. अनेकांनी संसार थाटला आहे. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे सई लोकूर होय. सईने या वर्षाच्या सुरुवातीला तिचा बॉयफ्रेंड तीर्थदीप रॉय याच्याशी विवाह केला आहे. त्यांनी अगदी पारंपारिक पद्धतीने लग्न केले आहे. लग्नानंतर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अशातच सई आणि तीर्थदीप यांच्या लग्नाला १० महिने पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने ते दोघे मालदीवला गेले आहेत. तेथील अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सईने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती आणि तिचा पती मालदीवमध्ये एन्जॉय करत आहेत. काही फोटोमध्ये ते दोघे समुद्र किनारी एन्जॉय करताना दिसत आहेत. तर काही फोटोंमध्ये ते दोघे बोटमध्ये आहेत. या फोटोमध्ये ते दोघे फ्लोटिंग नाश्ता करताना दिसत आहेत. तिने निळ्या रंगाचा बिकिनी टॉप घातला आहे तसेच डोळ्यांवर चष्मा लावलेला आहे. तर तिचा पती तीर्थदीप शर्टलेस दिसत आहे. ते दोघेही पाण्यात मस्ती करताना दिसत आहे.

त्यांचे हे फोटो त्यांच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहेत. तिचे चाहते या फोटोवर हार्ट तसेच फायर ईमोजी पोस्ट करत आहेत. (marathi actress sai lokur share photos with her husband of maldives )

सई ही ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सीझनमध्ये स्पर्धक होती. या शोमध्ये ती फिनालेपर्यंत गेली होती. पण ती हा शो जिंकू शकली नव्हती. त्यानंतर ती खूप चर्चेत आली. या शोने तिला खरी ओळख मिळाली. बिग बॉसच्या घरात असताना तिची आणि पुष्कर जोगची मैत्री खूप चर्चेत आली होती. एवढंच काय तर एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, “पुष्करचे लग्न झाले नसते तर मीच त्याच्याशी लग्न केले असते.”

सई लोकूरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केले आहे. तिने ‘किस किस को प्यार करू’, ‘पारंबी’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘जरब’, ‘कुछ तुम कहो कुछ हम कहे’, ‘मी आणि तू’, ‘स्माईल प्लिज’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-उफ्फ ब्यूटी! तेजस्विनीच्या स्टायलिश लूकने इंटरनेटवर लावली आग, बेडवर बसून देतेय फोटोसाठी पोझ

-शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार ‘डबल रोल’मध्ये? जाणून घ्या काय आहे आगामी चित्रपटाची कथा

-उर्वशी रौतेलालाही मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

हे देखील वाचा