‘इंडियन आयडल’ हा टेलिव्हिजनवरील सर्वात मोठा रियॅलिटी सिंगिंग शो आहे. हिंदीमध्ये या शोने प्रेक्षकांची खूप लोकप्रियता मिळवली आहे. हिंदीमध्ये इंडियन आयडल शोचे १२ पर्व पूर्ण झाले आहेत. अशातच मागील अनेक दिवसांपासून ‘इंडियन आयडल मराठी’ येणार आहे अशा बातम्या येत होत्या. ह्या बातम्या आल्यापासूनच संगीत प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. तसेच स्पर्धकांना देखील त्यांची गायन कला जगासमोर दाखवण्यासाठी एक नवे आणि मोठे व्यासपीठ मिळणार आहे. अनेक दिवसापासून या शोची चर्चा रंगली आहे. आता शो येणार म्हटल्यावर शोच्या परीक्षकपदी कोण असणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते. एवढा मोठा शो म्हटल्यावर त्याचे परीक्षक देखील तसेच असतील याची सगळ्यांना खात्री होती. परंतु या शोचे परीक्षण नक्की कोण करणार याबाबत माहिती गुलदस्त्यातच ठेवण्यात आली होती. परंतु आता प्रतीक्षा संपली असून, या शोचे परीक्षण कोण करणार याची माहिती समोर आली आहे.(popular singer ajay-atul will host indian ideol marathi)
हा लोकप्रिय शो मराठीमध्ये पहिल्यांदाच येणार असून, नुकतेच सोशल मीडियावर या लोकप्रिय शोच्या परीक्षकांची नावे जाहीर करण्यात आली आहे. या शोच्या परीक्षकपदी हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी आपल्या संगीताने गाजवणारी जोडी अजय-अतुल विराजमान होणार आहे. एका व्हिडिओद्वारे अजय-अतुल त्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. हा व्हिडिओ सोनी मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. सोबतच अजय-अतुल यांचा देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते दोघे या शोचे प्रमोशन करताना दिसत आहे.
ही बातमी समजताच प्रेक्षकांमध्ये आणि संगीत क्षेत्रातील मंडळींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. इंडियन आयडल हा भव्य दिव्य शो पहिल्यांदाच मराठीमध्ये सुरु होत आहे. त्यामुळे हा शो कसा असणार आहे याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. तसेच आता अजय-अतुल ही जोडी हा शो जज करत असल्याची बातमी समोर आल्यामुळे शोला चार चाँद लागणार यात काही वादच नाही.
अजय-अतुल या शोमध्ये पाहण्यासाठी सगळेच खूप उत्सुक झाले आहेत. अजय-अतुल यांनी अनेक सुपरहिट गाणी तयार केली आहेत. केवळ मराठीतच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील त्यांच्या कार्याचा डंका आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-उफ्फ ब्यूटी! तेजस्विनीच्या स्टायलिश लूकने इंटरनेटवर लावली आग, बेडवर बसून देतेय फोटोसाठी पोझ
-शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार ‘डबल रोल’मध्ये? जाणून घ्या काय आहे आगामी चित्रपटाची कथा
-उर्वशी रौतेलालाही मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद