श्वेता तिवारी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. श्वेताने अनेक मोठ्या आणि सुपरहिट मालिकांमध्ये काम करत अमाप लोकप्रियता मिळवली. आज श्वेताला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. प्रेरणा बनत तिने थेट प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. श्वेता तिच्या कामामुळे नेहमीच चर्चेत असते, मात्र ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील खूप गाजली. मागच्या दोन वर्षांपासून तिच्या विवाहित आयुष्यातील समस्यांमुळे ती चांगलीच प्रकाशझोतात आली.
श्वेता काही काळापासून तिच्या मुलाची तिला कस्टडी मिळावी यासाठी कोर्टात केस लढत होती. आज या केसचा निकाल लागला असून, हायकोर्टाने श्वेताला तिच्या मुलाची रेयांशची कस्टडी दिली आहे. या निर्णयामुळे श्वेता खूपच खुश असून, तिने या निर्णयाचे स्वागत केले आहे. रेयांश लहानपणापासूनच श्वेताजवळ राहिला होता.
मात्र मागील दोन वर्षांपासून श्वेता आणि अभिनवमध्ये सुरू असलेला वाद रेयांशच्या कस्टडीपर्यंत गेला. अभिनवने श्वेता त्याला रेयांशला भेटू देत नसल्याचा आरोप केला, आणि कोर्टात रेयांशच्या कस्टडीची मागणी करणारी एक याचिका दाखल केली. या याचिकेत त्याने श्वेता एक अभिनेत्री असून, ती शूटिंगमध्ये व्यस्त असते आणि मुलाला वेळ देऊ शकत नाही सांगत त्याला कस्टडी मिळावी अशी मागणी केली होती.
पण ही याचिका कोर्टाने रद्द करत रेयांशची कस्टडी श्वेताला देत, अभिनवला आठवड्यातून दोनदा श्वेताच्या घरी, सर्व कुटुंबाच्या उपस्थितीत भेटण्याची परवानगी दिली आहे. एका मुलाखतीमध्ये श्वेताने सांगितले की, “मी कोटाच्या या निर्णयामुळे खूप खुश आहे. मला ह्याच निर्णयाची अपेक्षा होती. मागच्या दोन वर्षांपासून, मी रेयांशला घेऊन जिथे जिथे जात होती तिथे तिथे अभिनव आमचा पाठलाग करायचा आणि मला त्रास द्यायचा.अभिनवने माझ्यावर लावलेले आरोप चुकीचे असून, मिकधीच त्याला आणि रेयानशला भेटण्यापासून, बोलण्यापासून अडवले नाही.”
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-उफ्फ ब्यूटी! तेजस्विनीच्या स्टायलिश लूकने इंटरनेटवर लावली आग, बेडवर बसून देतेय फोटोसाठी पोझ
-शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार ‘डबल रोल’मध्ये? जाणून घ्या काय आहे आगामी चित्रपटाची कथा
-उर्वशी रौतेलालाही मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद