Saturday, April 19, 2025
Home मराठी मल्हार अडकेल का अंतराच्या प्रेमात? योगिताचा नवीन लूक पाहून, चाहत्यांमध्ये रंगलीय एकच चर्चा

मल्हार अडकेल का अंतराच्या प्रेमात? योगिताचा नवीन लूक पाहून, चाहत्यांमध्ये रंगलीय एकच चर्चा

‘जीव माझा गुंतला’ या मालिकेमध्ये असलेली अंतरा म्हणजेच योगिता चव्हाण सध्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेमध्ये तिच्या भूमिकेने ती घराघरात पोहचली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील बरीच सक्रिय असते. तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अशात तिने नुकतेच काही फोटो चाहत्यांसाठी पोस्ट केले आहेत.

यामध्ये तिने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. तिची साधी- सिंपल साडी आणि त्यावर आसलेला लाल रंगाचा ब्लाऊज तिच्यावर खुप खुलून दिसत आहे. यामध्ये तिने हातात हिरवा चुडा देखील भरला आहे. भाळी नाजूक टिकली, मोकळे केस आणि गळ्यात डोरलं यामुळे ती खूप सुंदर दिसत आहे. अभिनेत्री कायमच्या लाईट मेकअपमध्ये दिसते. (Yogita Chavan news look viral on social media)

तिने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “नवीन अंतरा.” तिने शेअर केलेल्या या फोटोवर अनेकांनी हार्ट ईमोजीचा वर्षाव केला आहे. तसेच तिच्या एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले आहे की, “मल्हार आता प्रेमात पडेल बहुतेक” अभिनेत्री तिच्या या लुकमध्ये मालिकेत झळकणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे मालिकेत मल्हार म्हणजेच सौरभ चौगुले आता तिच्या प्रेमात पडणार असे सर्वांना वाटत आहे.

काही दिवसांपूर्वीच या मालिकेच्या सेटवर योगिताला भेटायला पहिल्या महिला रिक्षा चालक रेखा दुधाणे आल्या होत्या. त्यांना पाहून अभिनेत्री खूप खुश झाली. त्यावेळी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये योगिता म्हणाली होती की, “रेखा ताई माझ्या खोलीत आल्या, तेव्हा त्यांचे व्यक्तिमत्त्व बघून मला काही शब्दच सुचले नाहीत. खाकी गणवेश आणि चेहऱ्यावरचे तेज यामुळे मी भारावून गेले. त्यांना पाहून मला अंतराचे भविष्य दिसले. त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाचे मी प्रतिनिधित्व करते याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे.” योगिताने मालिकेमध्ये काम करण्यासाठी खास रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडमध्ये तयार झाले गांधीजींच्या विचारांचं दर्शन घडविणारे चित्रपट, एकावर तर पाकिस्तानने घातली होती बंदी

-‘मला खुश राहायचंय’, म्हणत घराच्या छतावर पावसाळी वातावरणाचा आनंद लुटताना दिसली ‘स्वीटू’

-लग्नाच्या पहिल्या रात्रीच अक्षय कुमारला समजलं होतं पत्नी ट्विंकलचं ‘हे’ सत्य, अभिनेत्याने सर्वांसमोर केला खुलासा

हे देखील वाचा