Wednesday, January 14, 2026
Home बॉलीवूड आता येणार मजा! रश्मिका मंदाना अन् अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा- द राइज’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीझ

आता येणार मजा! रश्मिका मंदाना अन् अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा- द राइज’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीझ

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या आगामी चित्रपटाची चर्चा सुरू होती. काही दिवसांपूर्वी ‘पुष्पा- द राइज’ या चित्रपटाचं एक गाणं आणि ट्रेलर प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार, याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले होते. आता चाहत्यांच्या मनातील चित्रपटाच्या प्रदर्शनाचे प्रश्न संपणार आहेत. कारण या वर्षाच्या शेवटी म्हणजेच १७ डिसेंबर, २०२१ ला हा चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाचा पहिला भाग यंदा प्रेक्षकांच्या भेटीला येत असून दुसरा भाग साल २०२२ मध्ये पाहायला मिळणार आहे.

निर्मात्यांनी सांगितली ‘ही’ गोष्ट
मैथ्री मुव्ही मेकर्सचे नवीन यरनेनी आणि व्हाय. रवी शंकर यांनी एकत्रित सांगितले आहे की, “आम्ही पहिल्यापासून प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे आणि अनोख्या अंदाजाने चित्रपट बनावा असा प्रयत्न केला आहे. आम्हाला आशा आहे की, ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटामध्ये ॲक्शन, रोमांस आणि इमोशन प्रेक्षकांना आवडेल. हा चित्रपट एक अद्वितीय कहाणी दर्शवतो. भारतीय सिनेसृष्टीमध्ये अशी कहाणी आजवर कुणी साकारलेली नाही. आम्ही अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या चाहत्यांबरोबर प्रदर्शनाची तारीख जाहीर करून खूप खुश आहोत.”

रश्मिका मंदानाच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने आजवर दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केलेला आहे. ‘मिशन मजनू’मधून ती लवकरच बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर देखील झळकणार आहे. तसेच ‘गुडबाय’ आणि ‘आदवाल्लू मीकु जोहारलू’ या दोन चित्रपटात देखील ती झळकणार आहे.

‘पुष्पा- द राइज’ मध्ये देखील तिचा अनोखा अंदाज पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. आयकॉन स्टार, सुकुमार आणि देवी श्री प्रसाद या तिघांची जोडी तिसऱ्यांदा एकत्र काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सुरू होण्यापूर्वीच ‘बिग बॉस १५’च्या घरातील व्हिडिओ झाला लीक; यावेळी ‘असे’ असेल ‘बिग बॉस’चे घर

-शर्टची बटणं खोलून साराने हॉट फोटो केले शेअर, तिच्यावरून नजर हटविणंही झालंय कठीण

-‘ही पाहा ऍटिट्यूडवाली आंटी…’, करीनाचे उद्धट वागणे पाहून नेटकऱ्यांची सुनावले तिला चांगलेच खडेबोल

हे देखील वाचा