मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधींचा जन्म२ ऑक्टोबर, १८६९ रोजी पोरबंदर येथे झाला होता. आज म्हणजे शनिवारी (२ ऑक्टोबर) सर्वजण त्यांची जयंती उत्साहात साजरी करत आहेत. अशात भारतीय सिनेसृष्टीमध्ये गांधीजींच्या जीवनावर अनेक चित्रपट साकारण्यात आले. परंतु साल १८८२ मध्ये आलेल्या ‘गांधी’ चित्रपटासारखा चित्रपट आजवर झाला नाही. यामध्ये बेन किंग्सले यांनी गांधीजींची भूमिका साकारली होती. ते एक विदेशी कलाकार होते. परंतु भारताविषयीचा आदर त्यांनी या भूमिकेतून दाखवून दिला.
चित्रपट साकारल्यानंतर साल १९१९ मध्ये त्यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी चित्रपटातील काही अविस्मरणीय किस्से सांगितले. यामध्ये त्यांनी चित्रपटामधील अंत्यसंस्काराच्या सीनचे देखील काही किस्से सांगितले. ते म्हणाले की, “अंत्यसंस्काराचा सीन शूट करताना एकूण ४ लाख व्यक्तींना तिथे बोलवले होते. माझ्यासाठी हे खूप विलक्षणीय होते.”
‘मी थक्क झालो होतो’
बेन म्हणतात की, “मला एकाच व्यक्तीमध्ये सागराच्या खोली एवढे प्रेम दिसले. भारतामधले लोक खूप उदार आहेत. आता तुम्ही बघा, कोणी CGI नव्हतं, तुम्ही यावर विश्वास ठेवू शकता का? अंत्यसंस्कारावेळीचे दृश्य पाहून मी थक्क झालो होतो.”
एटनबरो यांनी अशक्य गोष्ट केली होती शक्य
पुढे बोलताना ते म्हणाले की, “मला आजही आठवत आहे. रिचर्ड एटनबरो यांनी मला त्यांच्याबरोबर गांधीजींचे फोटो पाहाण्यासाठी बोलवले होते. त्यांनी ते फोटो खूप छान पद्धतीने एकत्र ठेवले होते. कारण तो एक आयकॉनिक कॅरेक्टर होता आणि ५ तासांचे फोटो मी एका बैठकीत पाहिले होते. एटनबरो यांनी अशक्य गोष्ट शक्य केली होती. हे सर्व काही बर्फाने आच्छादलेल्या एका उंच पर्वतावर उभे राहिल्यासारखे होते.”
जिंकले होते एकूण आठ पुरस्कार
चित्रपटामध्ये रोहिणी हट्टंगडी, सईद जाफरी, ओम पुरी, अमरीश पुरी आणि नीना गुप्ता यांच्यासह आणखीन काही कलाकारांनी अभिनय केला होता. चित्रपटाने ऑस्करचे एकूण आठ पुरस्कार जिंकले होते. रिचर्ड एटनबरो यांनी ‘गांधी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मल्हार अडकेल का अंतराच्या प्रेमात? योगिताचा नवीन लूक पाहून, चाहत्यांमध्ये रंगलीय एकच चर्चा