Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

भयावह! बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना आलाय खऱ्या भूतांचा अनुभव, ऐकून तुमचाही उडेल थरकाप

आपल्या आजूबाजूला आणखी एक जग आहे. परंतु ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, असे अनेक जण म्हणतात. भूत, प्रेत, जादूटोणा अशा विषयांवर बॉलिवूडमध्ये अनेक चित्तथरारक चित्रपट आजवर तुम्ही पाहिले असतील. अशात अनेक मंडळी भूत आहेत असा दावा करतात, तर काहीजण याकडे दुर्लक्ष करतात. तसेच हे सर्व खोटं आणि काल्पनिक आहे असेही म्हणतात. अशात भुतांचा अभिनय करताना बॉलिवूडमधील काही कलाकारांनी देखील भुतांचा सामना केला आहे. अशाच काही कलाकारांचे किस्से जाणून घेऊयात. (Bollywood stars had faced ghosts in real life)

क्रिती सेनन
अभिनेत्री क्रिती सेननने तिचा भुताशी संबंधीत एक किस्सा सांगितला होता. ‘दिलवाले’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना ती मेकअप आर्टिस्टसोबत शूटसाठी तयार होती होती. तेव्हा तिला अचानक मागून कोणीतरी धक्का दिला. तसेच तिकडे असलेली लोशनची बाटली देखील खाली पडली. तिने ती उचलून वरती ठेवली. पण पुन्हा ती बाटली खाली पडली.

बिपाशा बासू
बिपाशाने देखील भुतांचा अनुभव घेतला आहे. चित्रपट ‘राज’च्या शूटिंग वेळी ती ज्या हॉटेलमध्ये थांबली होती, तेव्हा तिला तिथे भुतांचा आभास होत होता. तसेच ‘गुनाह’ चित्रपटावेळी देखील तिला भुतांची जाणीव झाली होती.

रणवीर सिंग
‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाचे शूटिंग करताना रणवीरला देखील भुतांचा भास झाला होता. त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “शूटिंग वेळी मी सेटवर एका खोलीत होतो. त्यावेळी अचानक भिंतीवर धूळ जमा झाली. त्यामध्ये पेशवा बाजीराव यांची प्रतिमा दिसत होती.”

वरुण धवन
अभिनेता वरुण ‘एबीसीडी २’ चित्रपटासाठी लॉस वेगासमध्ये होता. निर्मात्यांनी ज्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती, तिथे एका गायकाचा मृत्यू झाला होता. अनेकांनी त्याची आत्मा तिथेच भटकत असल्याचे म्हटले होते. याची प्रचिती अभिनेत्याला देखील आली. त्याच्या खोलीचे दार आपोआप बंद होत होते आणि उघडत होते. तसेच त्याला गाण्याचा आवाज देखील येत होता.

अलाया फर्निचरवाला
अभिनेत्री अलायाने एका मुलाखतीमध्ये तिला आलेल्या भुतांच्या अनुभवाबद्दल सांगितले होते. ती म्हणाली होती की, “मी न्यूयॉर्कला शिक्षणासाठी गेले होते. तेव्हा तिथे माझ्या खोलीत खूप विचित्र घटना घडत होत्या. मला अचानक कोणाच्या तरी पायांचा चालतानाचा आवाज यायचा. तसेच बाथरुममधील शॉवर देखील आपोआप चालू व्हायचा.”

सोहा अली खान
अभिनेत्री सोहाने देखील तिचा अनुभव सांगितला होता. ‘गँग ऑफ घोस्ट’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी ती एका हॉटेलमध्ये थांबली होती. तिथे रिकाम्या खोलीमधून तिला कोणी तरी किंचाळत असल्याचा आवाज येत होता.

सनी लिओनी
अभिनेत्री सनीला देखील भुतांचा भयंकर अनुभव आला होता. राजस्थानमध्ये ती एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. त्यावेळी ती ज्या हॉटेलमध्ये थांबली होती, तिकडे रात्री तिला कोणी तरी पकडुन ठेवल्यासारखे वाटत होते. तिच्या बरोबर हे तिसऱ्यांदा झाले, तेव्हा ती जोरात किंचाळली आणि बाहेर आली.

राजकुमार राव
‘स्त्री’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी अभिनेता मध्यप्रदेशच्या चंदेरी गावामध्ये होता. त्यावेळी त्याला काळजाचा ठोका चुकवणारा अनुभव आला. रात्री शूटिंग वेळी अचानक लाईट बंद चालू होऊ लागली होती.

इमरान हाश्मी
अभिनेत्याने फक्त भुतांच्या चित्रपटात काम नाही केले, तर त्याने त्यांचा अनुभवही घेतला आहे. सुट्टीमध्ये तो एका ठिकाणी फिरायला गेला होता. त्यावेळी तो जिथे राहत होता तिथे अचानक कोणाचे तरी ओरडण्याचे आणि किंचाळण्याचे आवाज येत होते.

गोविंदा
गोविंदाचा अनुभव ऐकून तर तुम्हाला घामच फुटेल. एकदा शूटिंगसाठी तो ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, तिथे त्याला त्याच्या बाजूला एक बाई बसल्याचा भास झाला. त्याने लगेच तेथील लाईट चालू केले. तेव्हा तिथून त्याला ती सावली जाताना दिसली.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ये चाँद सा रोशन चेहरा’, समृद्धी केळकरच्या लूकवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

-मल्हार अडकेल का अंतराच्या प्रेमात? योगिताचा नवीन लूक पाहून, चाहत्यांमध्ये रंगलीय एकच चर्चा

-‘मुलं जन्माला घालायला वेळ कधी मिळतो?’, मलायकाने विचारलेल्या प्रश्नावर कपिलचे मजेशीर प्रत्युत्तर, म्हणाला…

हे देखील वाचा