बॉलिवूडमध्ये अनेक नवीन पिढीच्या अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे. या अभिनेत्री चित्रपटांमध्ये काम करत असतांनाच य अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील प्रकाशझोतात येतात. सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ शेअर करत त्या नेहमी मीडियाच्या आणि फॅन्सच्या नजरेत येतात. सोशल मीडियावर नेहमीच अभिनेत्रींच्या पोस्टच्या चर्चा रंगताना दिसतात. अभिनेत्री बहुतकरून त्यांच्या फोटोशूटचे फोटो आणि प्रवासाच्या अपडेट शेअर करतात.
आजच्या पिढीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अलाया फर्निचरवाला देखील यातलीच एक अभिनेत्री आहे. ‘जवानी जानेमन’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अलायाने खूपच कमी काळात चांगलेच नाव कमावले आहे. अलायाने एकच सिनेमा केला असला तरी तिची लोकप्रियता ही प्रचंड प्रमाणात आहे. अलाया खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर ती नेहमीच तिचे बिकिनी फोटो टाकत असते.
सध्या अलाया मालदीवमध्ये तिच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या सुट्ट्यांचा आनंद घेत असताना तिने तिचा एक मादक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये नारंगी रंगाच्या बिकिनीमध्ये ती पूलमध्ये ब्रेकफास्टचा आनंद घेतांना दिसत आहे. मालदीवमध्ये पूलमध्ये सकाळचा नाश्ता पूलमध्ये करणे खूपच प्रसिद्ध आहे. अनेक कलाकार या फ्लोटिंग नाश्त्याचा आस्वाद घेतांना दिसतात.
तिने तिचा हा फोटो पोस्ट करताना लिहिले, “खाल्यानंतर अर्धा तास थांबा, नंतरच स्विमिंग करा.” अलायाच्या या पोस्टवर तिचे फॅन्स आणि कलाकार देखील कमेंट्स करत आहे. लवकरच अलाया ‘फ्रेडी’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरु असून, लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होईल असे सांगितले जात आहे.
अलाया ही प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या पूजा बंदीची मुलगी आणि अभिनेते कबीर बेदी यांची नात आहे. अलाया ही पूजा बेदी आणि पती फरहान फर्नीचरवाला यांची आलिया मुलगी आहे. २००३ मध्ये पूजा आणि फरहान विभक्त झाले.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मोठी बातमी! शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला कोर्टाने दिली एक दिवसाची एनसीबी कस्टडी
-क्रूझ ड्रग्ज पार्टीत शाहरुख खानच्या मुलाला घेऊन जाणारा अरबाज मर्चंट आहे तरी कोण?
-‘माझ्या मुलाने माझ्यासारखं न वागता…’, तर शाहरुखला आर्यनकडून होत्या ‘अशा’ विचित्र अपेक्षा