टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस मराठी’ हा शो चांगलाच रंगात आला आहे. दोन आठवड्यात सदस्यांमधील मस्ती, भांडण आणि प्रेम पाहायला मिळाले आहे. दुसऱ्या आठवड्याचा वीकेंड देखील चांगलाच धमाकेदार झाला. यात घरातील सदस्य तसेच बिग बॉस प्रेमींसाठी एक नाराजीची बातमी समोर आली, ती म्हणजे या शोमधील चर्चित सदस्य ह. भ. प. शिवलीला पाटील हिची तब्येत ठीक नसल्याने ती स्वइच्छेने या शोमधून बाहेर गेली आहे. तसेच या आठवड्याचे इलिमिनेशन देखील रद्द करण्यात आले होते, पण ही गोष्ट घरातील सदस्यांना माहिती नव्हती. त्यामुळे मांजरेकरांनी सगळ्यांची शाळा घ्यायचे ठरवले. त्यांनी नॉमिनेट झालेल्या सदस्यांना सांगितली की, “समोर बॅग ठेवली आहे, ज्यात पाच लाख रुपये आहेत. ज्याला ती बॅग पाहिजे त्यांनी ती घ्या आणि घराबाहेर जा.”
यानंतर आविष्कार उठतो आणि सांगतो की, तो ही बॅग घेऊन बाहेर जाणार आहे. यावर मांजरेकर त्याला म्हणतात की, “तुझी बॅग बाहेर पाठवली जाईल तू आता जा.” यानंतर तो उठतो आणि मुख्य दरवाजाकडे जातो. त्याचं हे वागणं पाहून मात्र मांजरेकर आणि घरातील सगळेच सदस्य हैराण होतात. यानंतर मांजरेकर त्याला सांगतात की, “एकदा उघडून तरी बघ त्यात काय आहे. पैसे मोजून घेऊन जा.” जेव्हा आविष्कार बॅग उघडतो, तेव्हा त्यात फक्त पेपर असतात. यावर मांजरेकर त्याला खूप बोलतात आणि म्हणतात की, “पैसे बघताच तुझा निर्णय बदलला तू.” यावर आविष्कार खूप नाराज होतो. (Bigg Boss Marathi 3 : avishkar darvhekar hug ex. wife sneha wagh and apologize )
वीकेंडचा डाव जेव्हा संपतो, तेव्हा आविष्कार एकटाच बसून रडत असतो. त्यावेळी सुरेखा ताई तिथे येतात आणि त्याला समजावू लागतात की, “आम्ही सगळे इथे आहोत तुला कधी काही वाटलं, तर आमच्याशी येऊन बोलत जा, असा एकटा नको बसत जाऊस.” यावेळी बाकी सगळे तिथेच असतात. तसेच स्नेहा देखील त्याच्या मागेच उभी असते. त्यावेळी विशाल त्याला सांगतो की, “ती मगाचपासून तिथेच आहे, तेव्हा आविष्कारला भावना अनावर होतात आणि तो जाऊन स्नेहाला मिठी मारतो. तसेच तो स्नेहाला सॉरी असे म्हणतो. यावर स्नेहा त्याला म्हणते की, “झालेल्या गोष्टीवर सॉरी बोलून काय होणार नाही आता.” तरीही आविष्कार तिथेच तिचा हात धरुन तिची माफी मागत असतो.
हा एपिसोड पाहून प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता निर्माण झाली आहे की, इथून पुढचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील स्नेहा आणि आविष्कारचा प्रवास कसा असणार आहे. तसेच बिग बॉसच्या घरात ते पुन्हा एकत्र येतील का असा प्रश्न देखील अनेकजण उपस्थित करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘बिग बॉस मराठी’च्या घरात रंगणार ‘माझे मडके भरी’ नॉमिनेशन टास्क, होणार जोरदार राडा
-पूजा सावंतच्या मनमोहक लूकने चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका, एक नजर टाकाच
-‘या’ कारणामुळे किर्तनकार शिवलीला पाटीलची ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून एक्झिट, सदस्यांना अश्रू अनावर